रोहित पवार हे बिनडोक आहेत आणि ज्यांनी त्यांना सल्ला दिला ते बेअक्कल आहेत, अशी टीका भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी रोहित पवारांवर केली.संघर्ष यात्रा आणि रोहित पवारांचा संबंध काय?. सोन्याच्या बाळूत्यात जन्मलेले रोहित पवार त्यांनी संघर्ष बघितला कधी.रोहित पवार यांची संघर्ष यात्रा सपशेल फेल झाल्याचे गोपीचंद पडळकर यांनी सांगितले.विधानभवन परिसरात प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना त्यांनी ही टीका केली.
रोहित पवार यांच्या संघर्ष यात्रेचा समारोप काल नागपूर येथे झाला.त्यांनतर रोहित पवारांनी आपल्या कार्यकर्त्यांसह मोर्चा विधानभवनाकडे वळवला असता.त्यांनतर पोलिसांनी लाठीमार करत रोहित पवारांसह अनेक कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले होते.रोहित पवारांच्या संघर्ष यात्रेला गोपीचंद पडळकर यांनी सपशेल फेल झाल्याचे सांगितले आणि निव्वल स्टंटबाजी असल्याचे त्यानी सांगितले.
हे ही वाचा:
‘चकमकीत मारले गेलेले दहशतवादी त्याच जागी दफन’
कलम ३७०वरील सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय म्हणजे भारतात दुफळी निर्माण करणाऱ्यांचा पराजय
मोहित पांडे बनले राम मंदिराचे पुजारी!
‘तुमच्याकडे किती खलिस्तानी राहतात?’
रोहित पवारांच्या संघर्ष यात्रेला राज्यभरातून कोणीच प्रतिसाद दिला नाही.तर मग चर्चेत कसे यायचं? या हेतूने आपला मोर्चा विधानभवनाकडे वळवायचा आणि पोलिसांशी हुल्लड बाजी करत सरकारवर आरोप करायचे.त्यामुले त्यांनी काल असा प्रकार केला.त्यांची संघर्ष यात्रा अपयशी ठरली आहे.त्यांच्या या कृत्याकडे महाराष्ट्रातील जनाला गांभीर्याने पाहत नाही, असे गोपीचंद पडळकर म्हणाले.