27 C
Mumbai
Tuesday, November 26, 2024
घरविशेषआव्हाडांच्या अटकेने रोहित पवार खचले; म्हणाले कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र?

आव्हाडांच्या अटकेने रोहित पवार खचले; म्हणाले कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र?

जितेंद्र आव्हाड यांना अटक झाल्यामुळे राष्ट्रवादीचा राडा

Google News Follow

Related

राष्ट्रवादी काँग्रेसचे ठाण्यातील नेते जितेंद्र आव्हाड यांना ठाण्यातील विवियाना मॉलमध्ये चित्रपट बंद करणे आणि एका प्रेक्षकाला बेदम मारहाण करण्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आल्यानंतर आता त्यावर प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. राष्ट्रवादीच्या अनेक कार्यकर्त्यांनी ठाण्याच्या वर्तकनगर पोलिस ठाण्यात गर्दी केली आणि कारवाईविरोधात घोषणाबाजी केली. राष्ट्रवादीच्या नेत्यांनी यासंदर्भात आव्हाड यांचीच बाजू घेतली.

यासंदर्भात राष्ट्रवादीचे नेते रोहित पवार यांनीही आव्हाड यांच्यासाठी किल्ला लढविला. ते म्हणाले की तुम्ही बघितले जितेंद्र आव्हाड चित्रपट बंद करण्यासाठी गेले होते. लोकांना अडचण होऊ नये म्हणून मदत करत होते. ही फिल्म चुकीच्या पद्धतीने दाखविण्यात आली आहे. सरकारनेच खरे तर तो चित्रपट बंद करायला पाहिजे होता. सरकार शब्दही काढत नाही. आव्हाड संदेश देत होते. चुकीच्या पद्धतीने इतिहास दाखवला जात असेल तर खपवून घेणार नाही. तरी त्यांच्यार कारवाई. एक आमदार गोळीबार करतो त्याच्यावर कारवाई केली जात नाही. बावनकुळेंनी जादूटोण्यावर वक्तव्य केले. त्यांच्यावर काय कारवाई केली जाणार. केंद्रीय यंत्रणा आवाज दाबण्याचा प्रयत्न.पोलिस यंत्रणेच्या मदतीने आवाज बंद करणार का, कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र.

हे ही वाचा:

ऑनलाइन फसवणुकीत महिलेचे ८ लाखांचे नुकसान!

झोमॅटोचे टी-शर्ट घालून लुटली बँकेंची रोकड

या प्रसिद्ध अभिनेत्याचा व्यायाम करताना झाला मृत्यू

भारताला आता वेगाने धावायचे आहे!

 

राष्ट्रवादीच्या नेत्या विद्या चव्हाण यांनी हा गृहखात्याचा गैरवापर असल्याचे म्हटले आहे. त्या म्हणाल्या की, मला वाटतं की भाजपाच्या फडणवीसांकडे गृहखाते आहे याचा गैरवापर कसा करायचा, धाकदपटशा कसा करायचा हे आता सुरू झाले आहे. ज्यांना अटक करायची त्यांना अटक केली जात नाहीए. चव्हाण यांनी आव्हाड यांचा बचाव करण्याचा आटोकाट प्रयत्न केला. त्या म्हणाल्या की, ज्यांचा दोष नाही त्यांना अटक करणे चुकीचे आहे. मनसेच्या कार्यकर्त्यांनी कष्टकरी, गरिबांना मारहाण केली त्यांना अटक झाली नाही. पण जितेंद्र आव्हाडांना अटक केली जात आहे. इतिहासाला धरून सिनेमा असेल तरच तो दाखवा. बाजीप्रभू देशपांडे काय होते हे माहीत नाही का, लोकांकडून पैसे उकळता, त्याला विरोध केला तर आव्हाडांना अटक करणार?

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
198,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा