रोहित शर्मा आणि रवींद्र जाडेजा यांच्या शतकांमुळे इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या कसोटीत भारताचा डाव सावरला. भारताने पहिल्या दिवशी ३ बाद ३३ अशा बिकट स्थितीतून ५ बाद ३२६ अशी भक्कम स्थिती प्राप्त केली.
सलामीवीर रोहित शर्मा एका बाजुला पाय रोवून उभा असताना यशस्वी जयस्वाल (१०), शुभमन गिल (०), रजत पाटीदार (५) हे झटपट माघारी परतले आणि भारत अडचणीत सापडला. पण रोहित शर्माने रवींद्र जाडेजासह किल्ला लढविला. दोघांनी चौथ्या विकेटसाठी २०४ धावांची भागीदारी करत भारताला सावरले. रोहित शर्माने तेव्हा आपली शतकी खेळी पूर्ण केली. रोहितने १३१ धावांची खेळी करताना १४ चौकार आणि ३ षटकार लगावले. रवींद्र जाडेजाने बिनबाद ११० धावा केल्या असून त्याच्या या शतकी खेळीत ९ चौकार आणि २ षटकारांचा समावेश आहे.
हे ही वाचा:
हवामानाचा अचूक अंदाज मिळणार; इस्रोकडून अत्याधुनिक उपग्रहाचे प्रक्षेपण
अराजकाचा नवा डाव; किसान आंदोलन ०.२
‘महाभारत’चे नितीश भारद्वाज यांचा पत्नीकडून मानसिक छळ!
भाच्याकडून मामा मामीकडे एक कोटी खंडणीची मागणी, भाच्याला अटक!
रोहित बाद झाल्यावर या सामन्याद्वारे कसोटी पदार्पण करणाऱ्या सर्फराजने वेगवान खेळ केला. त्याने ६६ चेंडूंत ६२ धावांची खेळी केली. त्याचे हे पदार्पणातच अर्धशतक झळकले. त्याच्या या खेळीत ९ चौकार आणि एका षटकाराचा समावेश होता. त्याच्या पत्नीनेही स्टँडमधून त्याच्या या खेळीबद्दल अभिनंदन केले. त्याची खेळी हळूहळू आकार घेत असताना तो धावचीत झाला. मात्र या तीन खेळाडूंच्या खेळीमुळे भारताला तीनशेचा टप्पा ओलांडता आला. इंग्लंडतर्फे मार्क वूड याने ६९ धावांत ३ बळी घेतले. तर टॉम हार्टलीला १ बळी मिळविता आला.