बांगलादेशमध्ये आरक्षणाच्या मुद्द्यावरून सुरू झालेल्या आंदोलनाने हिंसक वळण घेतले. हसीना शेख यांनी पंतप्रधान पदाचा राजीनामा देत भारतात आश्रय घेतला. मात्र, अजूनही बांगलादेशमध्ये परिस्थिती निवळली नसून राजकीय अस्थिरता आहे. अंतरिम सरकार स्थापन झालं असलं तरी बांगलादेशमध्ये अजूनही हिंसक कारवाया सुरु आहेत. या हिंसाचारादरम्यान आंदोलकांनी हिंदू अल्प संख्यांकांना लक्ष्य केल्याचे दिसून आले. मंदिरांची, हिंदूंच्या दुकानांची तोडफोड करण्यात आली. यावरून हिंदूंमध्ये संतप्त लाट उसळली आहे.
बांगलादेशात हिंदुंवर होत सातत्याने होत असलेले हल्ले लक्षात घेऊन आणि बांगलादेशींकडून सुरू असलेले घुसखोरीचे प्रयत्न पाहून भिवंडीमधील ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. संभाव्य घुसखोरीच्या पार्श्वभूमीवर भिवंडीच्या कोनगावातील ग्रामस्थ बांगलादेशी घुसखोरांविरोधात आक्रमक झाले आहेत. बांगलादेशी मुस्लिम घुसखोरांना गावात राहण्यास आणि व्यापार करण्यास सक्त मनाई असल्याचे बॅनर गावात लावण्यात आले आहेत. या बॅनरचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
हे ही वाचा:
नालासोपारामध्ये पोलिसांची कारवाई; दोन कोटींच्या अमली पदार्थांसह नायजेरीयन महिलेला ठोकल्या बेड्या
अराजकतेच्या गर्तेत सापडलेला बांगलादेश आता आर्थिक संकटाच्या छायेत!
भाजपाने त्रिपुुरातील ग्राम पंचायती, जिल्हा परिषदांत काँग्रेस, कम्युनिस्ट पार्टीचा सुपडा साफ केला!
वर्सोवा चौपाटीवर झोपलेल्याच्या अंगावरून गेली गाडी; दोघांना अटक
बॅनरवर म्हटले आहे की, “रोहिंग्या मुस्लीम आणि बांगलादेशी मुस्लीम घुसखोरांना गावात राहण्यास आणि व्यापार करण्यास सक्त मनाई आहे. अशी लोक गावात कुठेही आढल्यास पोलिसांना संपर्क करावा. भाईचारा (बंधु-बधुता) करणाऱ्या लोकांनी आपले ज्ञान आपल्या जवळच ठेवावे. आपला गाव आपली जबाबदारी. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम” असा इशारा देण्यात आला आहे. बॅनरच्या माध्यमातून सर्व गावकऱ्यांना आवाहन करण्यात आलं आहे. कोनगाव ग्रामस्थांकडून गावात बॅनर लावण्यात आले आहेत. तसेच या बॅनरचे स्टेटस व्हॉट्सअपवर ठेवत जनजागृती करण्यात आली आहे.