रॉजर बिन्नी बीसीसीआयचे नवे अध्यक्ष

भारताचे माजी क्रिकेटपटू रॉजर बिन्नी यांची भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (BCCI) अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे.

रॉजर बिन्नी बीसीसीआयचे नवे अध्यक्ष

भारताचे माजी क्रिकेटपटू रॉजर बिन्नी यांची भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (BCCI) अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे. बिन्नी ३६ वे अध्यक्ष कारभार पाहणार आहेत. रॉजर बिन्नी यांनी या पदासाठी एकट्याने नामांकन केले होते. त्यामुळे रॉजर बिन्नी यांच्याकडेच बीसीसीआयच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली जाणार असल्याचे जवळपास निश्चित होते. केवळ औपचारिकता म्हणून बीसीसीआय अध्यक्षपदाची निवडणूक पार पडली.

रॉजर बिन्नी हे सध्या कर्नाटक राज्य क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष आहेत. रॉजर बिन्नी याआधी बीसीसीआयच्या निवड समितीचा एक भाग होते.

अष्टपैलू रॉजर बिन्नी यांनी १९७९ ते १९८७ मध्ये भारतीय संघाचं प्रतिनिधित्व केलं आहे. रॉजर बिन्नीनं ७२ एकदिवसीय सामन्यांमध्ये ६२९ धावा केल्या आहेत. तर २७ कसोटी सामन्यांमध्ये ८३० धावा केल्या आहेत. त्यांनी कसोटीमध्ये पाच तर एकदिवसीय क्रिकेटमध्ये एक अर्धशतक झळकावलं आहे.

हे ही वाचा

येरवडा कारागृहातील कैदी जगात हुशार

आमदार संजय शिरसाट यांना हृदयविकाराचा झटका

नायजेरियात महापुराची तयारीच नसल्याने गमावले शेकडो जीव

सुशांतसिंग राजपूतच्या मैत्रिणीच्या आत्महत्येचे कारण आले समोर

रॉजर बिन्नी यांनी २७ कसोटी सामन्यांमध्ये ४७ विकेट्स घेतल्या आहेत. तर ७२ एकदिवसीय सामन्यांमध्ये ७७ विकेट्स घेतल्या आहेत. १९८३ च्या विश्वचषक विजेत्या संघाचा रॉजर बिन्नी हे महत्वाचे भाग होते. या विश्वचषकात रॉजर बिन्नी यांनी सर्वाधिक विकेट घेतल्या होत्या.

Exit mobile version