रॉजर बिन्नी, राजीव शुक्ला पाकिस्तानला जाणार

आशिया कपसाठी पीसीबीचे निमंत्रण स्वीकारले

रॉजर बिन्नी, राजीव शुक्ला पाकिस्तानला जाणार

पाकिस्तान क्रिकेट मंडळाच्या (पीसीबी) आमंत्रणानुसार, बीसीसीआयचे अध्यक्ष रॉजर बिन्नी आणि उपाध्यक्ष राजीव शुक्ला लाहोरला जाणार आहेत. दोघांनी आशिया कपसाठी पीसीबीचे निमंत्रण स्वीकारले आहे. दोघेही पदाधिकारी ४ ते ७ सप्टेंबर दरम्यान होणाऱ्या आशिया कपमधील सामन्यांना उपस्थित राहतील. पीसीबीने आशिया कपसाठी सचिव जय शाह यांच्यासोबत सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांना पाकिस्तानला येण्याचे आमंत्रण दिले होते. मात्र बीसीसीआयने केवळ अध्यक्ष बिन्नी आणि उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांना पाकिस्तानला जाण्यास मंजुरी दिली आहे.

 

बिन्नी आणि शुक्ला यांच्यासमवेत बीसीसीआयचे सचिव जय शहा भारत आणि पाकिस्तानदरम्यान २ सप्टेंबरला श्रीलंका येथे होणाऱ्या सामन्यासाठी उपस्थित राहतील. त्यानंतर तिघेही ३ सप्टेंबरला भारतात परततील. येथून बिन्नी आणि शुक्ला वाघा सीमेवरून लाहोर जातील. राजीव शुक्ला हे २००४मध्ये सौरव गांगुली याच्या नेतृत्वाखालील संघासोबतही पाकिस्तानला गेले होते.

हे ही वाचा:

सुशांत सिंग राजपूत अहंकारी नव्हता, पण या कारणासाठी त्याने अनेक चित्रपटांना दिला नकार

प्रज्ञानंद, बजरंग होणार आशियाई क्रीडा स्पर्धेत सहभागी

मुले, ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षेसाठी पोलीस दल बांधील

ज्येष्ठ गीतकार देव कोहली यांचे निधन

बिन्नी आणि शुक्ला यांना ४ सप्टेंबर रोजी पीसीबीतर्फे लाहोरमध्ये होणाऱ्या रात्रीच्या भोजन समारंभासाठी आमंत्रित करण्यात आले आहे. बीसीसीआयचे हे दोन्ही पदाधिकारी ४ सप्टेंबर रोजी अफगाणिस्तान विरुद्ध श्रीलंकेदरम्यानचा सामना आणि दुसऱ्या दिवशी पाकिस्तानचा सुपर ४ मधील पहिला सामना पाहतील.

 

आशिया कपला ३० ऑगस्टपासून सुरुवात होणार आहे. या स्पर्धेतील चार सामने पाकिस्तानमध्ये तर, नऊ सामने श्रीलंकेत होतील. भारताचा पहिला सामना २ सप्टेंबर रोजी पाकिस्तानविरुद्ध होईल. भारत ‘अ’ गटात आहे. या गटात पाकिस्तान आणि नेपाळ आहे. तर, ‘ब’ गटात बांग्लादेश, श्रीलंका आणि अफगाणिस्तानच्या संघांचा समावेश आहे.

Exit mobile version