लखनऊच्या या ‘रॉकेट वूमन’कडे चांद्रयान ३ ची जबाबदारी

या मोहिमेच्या संचालक म्हणून त्या कामगिरी पार पाडत आहेत.

लखनऊच्या या ‘रॉकेट वूमन’कडे चांद्रयान ३ ची जबाबदारी

भारताच्या महत्त्वाकांक्षी अशा चांद्रयान ३ मोहिमेच्या नेतृत्वाची जबाबदारी एका कर्तृत्ववान महिलेकडे आहे. त्यामुळे या मोहिमेला एक वेगळे महत्त्व प्राप्त झाले आहे. वैज्ञानिक ऋतू करिधाल यांच्याकडे ही जबाबदारी आहे.

या मोहिमेच्या संचालक म्हणून त्या जबाबदारी पार पाडत आहेत. लखनऊच्या ऋतू करिधाल श्रीवास्तव यांनी याआधी मंगळयान मोहिमेच्या उपसंचालक म्हणून काम पाहिले आहे. तेव्हा सर्वांत प्रथम त्या चर्चेत आल्या. त्यानंतर चांद्रयान – २ मोहिमेच्या संचालक म्हणून त्यांच्यावर जबाबदारी सोपवण्यात आली. ऋतू करिधाल लखनऊमध्ये लहानाच्या मोठ्या झाल्या आहेत. त्या लखनऊ विद्यापीठातून भौतिकशास्त्रातील द्विपदवीधर आहेत.  

विज्ञान आणि अंतराळासंदर्भात त्यांना आवड असल्याने त्यांनी बेंगळुरू येथे भारतीय विज्ञान संस्थानात प्रवेश घेतला. त्यानंतर ऋतू १९९७पासून इस्रोमध्ये रूजू झाल्या. एअरोस्पेस विषयात कौशल्य प्राप्त केलेल्या ऋतू यांना सन २००७मध्ये तरुण वैज्ञानिक पुरस्कारही मिळाला आहे. त्यांनी विविध मोहिमांमध्ये विशिष्ट प्रकारच्या भूमिका बजावल्यामुळे भारतातील प्रमुख अंतराळ वैज्ञानिकांमध्ये त्यांचा समावेश केला जातो. ऋतू यांना ‘रॉकेट वुमन’ही म्हटले जाते.

हे ही वाचा:

बंद दाराआड झालेल्या गोष्टी ठाकरेंच्या आग्रहाखातर रश्मी वहिनींना सांगाव्या लागल्या

मोदी यांचा ‘ग्रँड क्रॉस ऑफ द लिजन ऑफ ऑनर’ पुरस्काराने सन्मान

आम्हाला फार बोलायला लावू नका, तुम्हाला पळता भुई थोडी होईल

विकृतीचा कळस; महिलेवर आठ जणांकडून सामुहिक बलात्कार

ऋतू करिधाल यांनी मंगळयान मोहीम आणि चांद्रयान – २ मोहिमेत विशिष्ट भूमिका बजावली आहे. लहानपणापासूनच त्यांना अंतराळाबाबत विशेष आवड होती. त्यांना आतापर्यंत डॉ. एपीजे अब्दुल कलाम युवा वैज्ञानिक पुरस्कार, मंगळयान मोहिमेसाठी इस्रो टीम पुरस्कार, एएसआय टीम पुरस्कार, सोसायटी ऑफ इंडियन एअरोस्पेस टेक्नॉलॉजी अँड इंडस्ट्रीजचा एअरोस्पेस महिला पुरस्कारही मिळाला आहे.  

चांद्रयान ३ सोबत यावेळेल ऑर्बिटर पाठविण्यात येणार नाही. यावेळी प्रोपल्शन मोड्युलच्या माध्यमातून कारवाई होणार आहे. त्या माध्यमातून लँडर आणि रोव्हर चंद्रावर नेण्यात येईल. चंद्राच्या कक्षेत गेल्यावर हे यान चंद्राभोवती १०० किमीच्या गोलाकार कक्षेत फिरत राहील.

Exit mobile version