‘रस्ते वाहतुकीसाठी आहेत, प्रार्थनेसाठी नाहीत’, हिंदूंकडून शिस्त शिका!

योगी आदित्यनाथ यांनी दिला सल्ला, महाकुंभची केली आठवण

‘रस्ते वाहतुकीसाठी आहेत, प्रार्थनेसाठी नाहीत’, हिंदूंकडून शिस्त शिका!

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी पुन्हा एकदा रस्त्यावर नमाज अदा करण्याबाबत विधान केले आहे. प्रशासनाने मुस्लिमांना दिलेल्या इशाऱ्याचे समर्थन करताना त्यांनी म्हटले आहे की रस्ते वाहतुकीसाठी आहेत. यावेळी  मुख्यमंत्र्यांनी कुंभमेळ्याची आठवण काढत मुस्लिमांना हिंदूंकडून धार्मिक शिस्त शिकण्यास सांगितले.

मुख्यमंत्री योगी म्हणाले, रस्ते वाहतुकीसाठी असतात आणि याविरुद्ध जे लोक बोलत आहेत त्यांनी हिंदूंकडून धार्मिक शिस्त शिकली पाहिजे. ६६ करोड लोक प्रयागराजमध्ये आले. विशेष म्हणजे, एवढ्या मोठ्या प्रमाणात लोक असूनही, कोठे गुन्हा, चोरी, छेडछाड, तोडफोड आणि अपहरणाची घटना घडली नाही. याला म्हणतात धार्मिक शिस्त.

हे ही वाचा : 

‘राज्याचे नाट्यगृहधोरण दोन महिन्यात येणार’

रणवीर अलाहाबादियाला पासपोर्ट मिळणार नाही!

…आणि अनंत अंबानींनी कोंबड्याच दुप्पट किमतीने विकत घेतल्या!

चिलीच्या राष्ट्राध्यक्षांना मोदींनी समजावला अशोक चक्राचा अर्थ!

ते पुढे म्हणाले, श्रद्धेने भाविक आले, त्रिवेणी संगमात स्नान केले आणि पुन्हा आपल्या जागी निघून गेले. जर तुम्हाला सुविधा पाहिजे असतील तर शिस्त शिकली पाहिजे. मोहरमच्या मिरवणुका निघाल्या आम्ही कधीच रोखल्या नाहीत. पण हा, त्यांच्या ‘ताजिया’ची उंची थोडी कमी करण्यास सांगितले. कारण कि विजेच्या तारांना त्याचा स्पर्श झाला तर त्यांचा मृत्यू होईल. (ताजिया म्हणजे इमाम हुसेन यांच्या समाधीची प्रतिकृती, जी मिरवणुकीत नेली जाते, जिथे लोक शोक व्यक्त करतात)

कावड यात्रे दरम्यान लावण्यात येणाऱ्या डीजेची (साउंड ) उंची देखील आम्ही कमी करण्यास सांगतो. जो आदेशाचे पालन करत नाही त्याच्यावर कारवाई करतो. कायदा सर्वांसाठी समान आहे, तशी कारवाई देखील सर्वांवर केली जाते.  ईदवरून तुम्ही कोणते प्रदर्शन कराल?, नमाजच्या नावाने तासंतास रस्ते जाम कराल. नमाज पठन करण्याची जागा ईदगाह, मस्जिद आहे रस्ते नाहीत, असे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले.

चीनची चाटुगिरी फळली नाही, राहुलना चीनी चापट... | Dinesh Kanji | Rahul Gandhi | Xu Feihong | China |

Exit mobile version