28 C
Mumbai
Friday, November 22, 2024
घरविशेषठाण्यात पालिकेच्या कारभारालाच पडले मोठे भगदाड!

ठाण्यात पालिकेच्या कारभारालाच पडले मोठे भगदाड!

Google News Follow

Related

ठाण्यामध्ये रस्ता खचण्याचे प्रमाण हे दिवसागणिक वाढत आहे. कोपरी येथील बाराबंगला येथील रस्ता नुकताच खचलेला आहे. रस्त्याला अक्षरशः भगदाड पडलेले आहे. कोपरीत मलनिःस्सारण वाहिनीचे काम सुरू असताना, रस्त्याखालील माती खचल्याने तो रस्ता धोकादायक झाला आहे. त्यामुळे त्या रस्त्यावरील वाहतूक सुरक्षिततेच्या कारणास्तव बंद करण्यात आली आहे. ही घटना मंगळवारी सकाळी कोपरी बारा बंगला परिसरात घडली असून यामध्ये कोणालाही दुखापत झाली नसल्याची माहिती ठाणे प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली.

ठाणे पूर्व, कोपरी येथील बारा बंगला क्रमांक १ येथे मलनिस्सारण वाहिनी दुरुस्तीसाठी रस्ता खोदण्यात आला होता. याचदरम्यान पावसामुळे शेजारील रस्त्याखालील माती अचानक खचली. त्यामुळे तो रस्ता धोकादायक झाला आहे. या घटनेत कोणालाही दुखापत नाही.

घटनेची माहिती मिळताच कोपरी पोलीस कर्मचारी, मलनिस्सारण विभागाचे कर्मचारी व प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यातच त्या रस्त्यांवर वाहनांची वर्दळ असल्याने नागरिकांच्या सुरक्षेसाठी तो रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली. काही दिवसांपूर्वी ठाण्यामध्ये लोकमान्य नगर डेपोजवळ रस्ता खचला होता.

 

हे ही वाचा:

सोमवारपासून विद्या येई घमघम…

निर्भयांची कामगिरी; चोरावर पडली भारी..

आर्यन खानसह तिघांना एनसीबीने केली अटक!

आर्यनबाबत शाहरुखने केलेले ते वक्तव्य खरे ठरतेय?

 

यापाठोपाठ लोकमान्य नगर, यशोधननगर, इंदिरानगर, सावरकर नगर याभागातील वाहतुकीसाठी महत्त्वाचा मानला जाणारा रस्ता खचला असल्याचेही आता उघडकीस आलेले आहे. कामगार रुग्णालयापासून सावरकरनगरच्या दिशेने जात असलेल्या एका मार्गावर मोठे भगदाड पडले आहे त्यामुळे तोही रस्ता आता वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेला आहे. ठाण्यामध्ये लोकमान्यनगर ते ठाणे स्थानक येथे सतत टीएमटी बसेसची वाहतूक सुरू असते. हा रस्ता खचल्यामुळे आता ही वाहतूक दुसरीकडून वळविण्यात आलेली आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
193,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा