‘हेमा मालिनींच्या गालासारखे रस्ते बनवू’

आप आमदाराचे बेताल वक्तव्य, भाजपकडून कारवाईची मागणी

‘हेमा मालिनींच्या गालासारखे रस्ते बनवू’

देशातील विरोधी पक्षांच्या नेत्यांकडून महिलांचा अनादर केल्याच्या घटना वारंवार समोर येत आहेत. महिलांच्या रंग, रूप, वस्त्रावरून टिप्पणी करण्याचा प्रयत्न हे करत असताना. तसाच नुकताच प्रकार शिवसेना उबाठा गटाचे नेते अरविंद सावंत यांनी केला होता. अरविंद सावंत यांनी इम्पोर्टेड माल’ या शब्दाचा वापर करत महिलांवर टिप्पणी केली होती.

याच मालिकेत आम आदमी पार्टीच्या आमदाराने अभिनेत्री-राजकारणी हेमा मालिनी यांच्याबद्दल बेताल वक्तव्य केले आले. आप आमदार नरेश बल्यान यांनी म्हटले की, ‘उत्तम नगरचे रस्ते हेमा मालिनी यांच्या गालांसारखे गुळगुळीत बनवू’. दरम्यान, आप आमदाराच्या वक्तव्यावर भाजपाने टीका करत कारवाईची मागणी केली आहे. आमदाराच्या वक्तव्याचा व्हिडीओ सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

हे ही वाचा : 

सलमान खानला लॉरेन्स बिश्नोईच्या नावाने पुन्हा धमकी, पाच कोटींची मागणी

कॅनडामधील हिंदू मंदिरांवरील हल्ल्यांच्या निषेधार्थ हजारो कॅनेडियन हिंदूंकडून एकता रॅली

कॅनडात पोलिसच सामील झाला खलिस्तानी मोर्चात

ग्रँटरोडच्या हॉटेलच्या खोलीत सापडला सुरतच्या व्यापाऱ्याचा मृतदेह,मृतदेहासोबत होती मुलगी

सोशल मीडियावर समोर आलेल्या एका व्हिडिओ क्लिपमध्ये आप आमदार नरेश बल्यान म्हणतात, ‘सर्व टकाटक होवून जाईल, महिन्याच्या ३५ तारखेपर्यंत सर्व कामे वेगाने पूर्ण होतील, उत्तम नगरचे रस्ते हेमा मालिनीच्या गालासारखे बनवू.’ दरम्यान, दिल्ली भाजपचे प्रवक्ते प्रवीण शंकर कपूर यांनी या टिप्पणीचा निषेध केला आणि म्हटले की, नरेश बल्यान यांनी महिलांचा अनादर केला आहे आणि महिन्याच्या ३५ तारखेपर्यंत रस्ते दुरुस्त केले जातील असे सांगून परिसरातील लोकांचा अपमान केला आहे. महिलांचा अनादर करणाऱ्या आमदाराची हकालपट्टी करण्याची मागणी भाजपाने आप सुप्रिमो अरविंद केजरीवाल यांच्याकडे केली आहे.

आपच्या आमदार स्वाती मालीवाल आणि माजी राष्ट्रीय महिला आयोगाच्या (NCW) प्रमुख रेखा शर्मा यांनी बल्यान यांच्या विधानाचा “अधर्मवादी” म्हणून निषेध केला आणि त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली.

Exit mobile version