27 C
Mumbai
Tuesday, December 24, 2024
घरविशेषठाण्यातील रस्ता सात-आठ फूट खचला

ठाण्यातील रस्ता सात-आठ फूट खचला

Google News Follow

Related

ठाण्यातील लोकमान्यनगर भागातील मुख्य वाहुतकीचा रस्ता खचलेला आहे. दहा महिन्यांच्या कालावधीत हा रस्ता खचण्याची आताची दुसरी वेळ आहे. त्यामुळे एकूणच पालिकेच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उभे राहते. रस्ता खचून तब्बल सात ते आठ फूट खाली गेलेला असून, त्यामुळे आता स्थानिकांमध्येही याविषयी घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. मुख्य वाहतुकीचा हा रस्ता असल्यामुळे रस्ता खचला तेव्हा सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नाही. त्यामुळे आता हा रस्ता वाहतुकीसाठी धोकादायक बनलेला आहे. आता रस्त्याखालील मातीचे परीक्षण करण्याचा निर्णय पालिकेच्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडून घेण्यात आलेला आहे.

या रस्त्यावरून सतत टीएमटी बससेवा सुरू असते. तसेच लोकमान्यनगर भागातील डवलेनगर ते यशोधननगर हा मार्ग वाहतुकीसाठी महत्त्वाचा मानला जातो. गुरुवारी रात्री हा रस्ता खचून त्याठिकाणी ७ ते ८ फूट खोल खड्डा पडला. स्थानिकांनी प्रसंगावधान राखुन या मार्गावरील वाहतूक रोखली. त्यामुळे वाहन खड्डय़ात पडून होणारी दुर्घटना तात्पुरती का होईना टळलेली आहे.

गेल्या दहा महिन्यांपुर्वी रस्ता खचल्यानंतर हा रस्ता पूर्ववत करण्यात आला. परंतु हा पुन्हा एकदा खचल्याने रस्तेबांधकामाच्या वेळी वापरण्यात आलेले निकृष्ट दर्जाचे साहित्य अशी अनेक बोंबाबोंब आता होत आहे. शहरामध्ये अनेक भागांमध्ये खड्डेही आहेत. परंतु अशा प्रकारे रस्ता खचणे हे नागरिकांच्या जीवावर बेतण्यासारखे आहे. वाहनचालकांना स्वतःच्या जीव मुठीत घेऊनच त्यामुळे जावे लागत आहे. मुख्य म्हणजे हा रस्ता दोनदा खचल्याने तो वाहतुकीसाठी धोकादायक बनला आहे.

हे ही वाचा:

नाना पटोले हे महाराष्ट्राचे पप्पू

अन्नपूर्णा मठ मंदिराचे महंत रामेश्वर पुरी यांचे निधन

ओबीसी इम्पिरिकल डेटाचे सर्वेक्षण करणार ‘कलेक्टर’; मग केंद्र काय करणार?

उत्तर प्रदेशात ‘चप्पा चप्पा भाजपा’…ब्लॉक अध्यक्ष निवडणुकीत घवघवीत विजय

रस्त्याखालून गेलेल्या पाणी आणि मलवाहिन्यांमधून गळती होऊन हा रस्ता खचत असावा, असा प्राथमिक अंदाज आहे. एकूणच काय तर सर्वसामान्यांचे जगणे हे सरकारमुळे अतिशय बेभरवशाचे झालेले आहे. रस्त्यावरील खड्डे आणि त्यामुळे अनेकांचे आरोग्य आता बिघडत आहे. त्यात आता हे असे रस्ते खचणे म्हणजे जीवावर बेतल्यासारखेच आहे. टक्केवारीच्या सोसात पालिका मूग गिळून बसते. तिथेच कंत्राटदाराचे फावते आणि निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरले जाते. सर्वसामान्य माणूस मात्र या सर्व घडामोडीत हकनाकपणे बळी जातो.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा