स्वा. सावरकर स्मारकाच्या रिया सुतार, वैभवी इंगळे यांची चमक

स्वा. सावरकर स्मारकाच्या रिया सुतार, वैभवी इंगळे यांची चमक

स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकाच्या दोन मुलींनी राज्य व राष्ट्रीय स्तरावरील क्रीडा स्पर्धांत दिमाखदार यश संपादन केले. बॉक्सिंग स्पर्धेत रिया सुतारने राज्य बॉक्सिंग स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले तर तलवारबाजी खेळात राष्ट्रीय स्तरावर झालेल्या स्पर्धेत वैभवी इंगळेने रौप्यपदक जिंकले.

सांगली येथे १७ व्या ज्युनियर गर्ल्स महाराष्ट्र राज्य बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन २६ ते २९ डिसेंबर २०२१ या कालावधीत करण्यात आले होते. यामध्ये मुंबई जिल्ह्याच्या वतीने वीर सावरकर बॉक्सिंग क्लबच्या मृणाल गणवीर आणि रिया सुतार यांनी प्रतिनिधीत्त्व केले होते. या मध्ये रिया सुतार हिने ७५ ते ८० किलो वजनी गटात सुवर्णपदक पटकावले आहे. अहमदनगर जिल्ह्याच्या प्रतिनिधीचा तिने पराभव केला.

स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकातील सावरकर फेन्सिंग क्लबच्या वैभवी इंगळे हिने महाराष्ट्राचे नेतृत्व करीत तलवारबाजीमध्ये रौप्य पदक पटकावले आहे. तिचे मार्गदर्शक आनंद वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली ती प्रशिक्षण घेत असून राज्यस्तरीय स्पर्धेत वैभवीने यापूर्वी रौप्यपदक जिंकले होते. यातून चार मुलींची राष्ट्रीय तलवारबाजी स्पर्धेसाठी महाराष्ट्राचे नेतृत्व करण्यासाठी निवड करण्यात आली.  या चार मुलींनी सांघिक कामगिरी करत हरियाणातील सोनीपत येथे २९ व्या कनिष्ठ राष्ट्रीय तलवारबाजी (फॉइल गर्ल्स टीम इव्हेंट) स्पर्धेत रौप्य पदक जिंकले आहे.

हे ही वाचा:

बुटांनी काढला दहिसर बँक दरोडेखोरांचा माग

‘आम्ही २० करोड मुसलमान…’ नसिरुद्दीन शहांच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड

‘हे’ असेल झाशी स्थानकाचे नवे नाव

कालीचरण महाराजांना अटक

 

विद्यापीठात झालेल्या अखिल भारतीय आंतरविद्यापीठ तलवारबाजी चॅम्पियनशिप स्पर्धेत सुद्धा वैभवीची निवड करण्यात आली होती, अशी माहिती तिचे मार्गदर्शक आनंद वाघमारे यांनी दिली आहे. यातही तिने सुवर्ण पदक जिंकलेले आहे.

Exit mobile version