28 C
Mumbai
Saturday, December 28, 2024
घरविशेषआज जागतिक नदी दिवस; पण मुंबईतील नद्या मरणपंथाला!

आज जागतिक नदी दिवस; पण मुंबईतील नद्या मरणपंथाला!

Google News Follow

Related

मुंबई आणि उपनगरांतून वाहणाऱ्या मिठी, पोयसर, ओशिवरा आणि दहिसर या नद्या पुनरुज्जीवित होण्यासाठी हाती घेण्यात आलेली कामे पुरेशी नसून त्यामुळे नद्या मरणपंथाला लागल्या. नद्यांमधून पाणी ऐवजी रासायनिक पाणी आणि सांडपाणी वाहू लागले आहे. प्रदूषणातही कमालीची वाढ झाली आहे. नदीतील कचरा साफ करण्यासाठी मोठमोठे प्रकल्प हाती घेण्यात आले. मात्र, कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी काहीच हालचाली केल्या गेल्या नाहीत. मुंबईतील नद्यांना आता नाल्यांचे स्वरूप आल्याची तक्रार अनेक पर्यावरण क्षेत्रात काम करत असलेल्या नागरिकांनी केली आहे.

मिठी नदी स्वच्छता या उपक्रमामध्ये नदी पात्रात वाहणारा जास्तीत जास्त कचरा जमा करून त्याचे पुनर्चक्रीकरण केले जात आहे. फिनलंडच्या रिव्हररिसायकल यांनी विकसित केलेले विशेष तंत्र या उपक्रमात वापरण्यात येत आहे. ज्यामध्ये नदीच्या पाण्यावर तरंगणारा कचरा जमा करून त्याचे पुनर्चक्रीकरण केले जाते. अशा प्रकारचा हा देशातील पहिलाच प्रकल्प आहे. जालप्रवाहांवरील ताण कमी करण्यासाठी महत्त्वाच्या नऊ ठिकाणी तरंगता कचरा अडविण्यासाठीची यंत्रणा तैनात असून यामध्ये दहिसर, पोयसर आणि ओशिवरा नदी आणि महत्वाच्या नाल्यांचा समावेश आहे.

हे ही वाचा:

पुरात सर्वस्व वाहून गेले आता कागदपत्रं आणायची तरी कुठून?

सावळजच्या बाळू लोखंडेंची खुर्ची कशी पोहोचली इंग्लंडला?

महाराष्ट्र अंतिम फेरीत मुलांमध्ये दिल्लीशी तर मुलींमध्ये कोल्हापूरशी झुंजणार

मोदींनी आणली प्राचीन संस्कृती पुन्हा भारतात

मुंबईच्या नद्यांचा नैसर्गिक पूर निचरा कमी होत आहे. मुंबईतील नद्या या काँक्रीटिकरणाच्या अधीन आहेत. मिठी नदीच्या पूरक्षेत्रातील ५४ टक्के भागावर अतिक्रमण केलेले आहे. कुर्ला आणि कलिना भागातून मोठ्या प्रमाणावर भंगारचा कचरा नदीमध्ये जातो. प्लास्टिक आणि औद्योगिक कचऱ्याची वाढ झाली आहे. नद्यांना पुनरुज्जीवित करण्यासाठी कायमस्वरूपी उपाय योजनांची आवश्यकता आहे. नद्यांमध्ये कचरा टाकलाच जाणार नाही याकडे लक्ष दिले पाहिजे, पूर नियंत्रण रेषेमध्ये असणाऱ्या बांधकामांवर काही तोडगा काढणे गरजेचे आहे. नद्यांची खोली वाढवल्यामुळे पुराचे पाणी वाहून नेण्याची क्षमता वाढल्याने नद्यांना पूर आला तरी पुराचे पाणी पसरून त्यामुळे नुकसान होण्याचे प्रमाण कमी होईल.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
217,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा