गेले कित्येक दिवस अंबरनाथमधील गोवरी नदीचे पाणी दूषित होऊन पिण्यायोग्य राहिले नाही. कारखान्यातील रासायनिक पाणी नदीपात्रात सोडल्यामुळे नदीचे पाणी दुषित झालेले आहे. त्यात आता जलचर मरू लागले आहेत. या नदीच्या पाण्यात मृत मासे तरंगताना आढळल्याने खळबळ उडाली.
आपल्या मुंबई आणि ठाणे परिसरामध्ये नैसर्गिक जलसंपदा फार मोठ्या प्रमाणात आहेत. परंतु या जलसंपदा मात्र सद्यस्थितीत अतिशय बिकट अवस्थेमध्ये आहेत. वाढते शहरीकरण आणि त्या अनुषंगाने होणार प्रदूषण आता मुंबईसारख्या शहरांची डोकेदुखी होऊन बसले आहे. प्रदूषण रोखण्याकरता कोणतीही कठोर पावले सरकारकडून उचलली न गेल्यामुळे पर्यावरणाचा समतोल ढासळलेला आहे.
हे ही वाचा:
निलंबनाचे महाभारत…
ठाकरे सरकारने मार्शल पाठवून आवाज दाबण्याचा प्रयत्न केला
अभिरूप विधानसभेतून घुमला ठाकरे सरकारच्या निषेधाचा सूर
ट्विटरला आता उच्च न्यायालयानेही झापले
अंबरनाथ तालुक्यातील टाहुलीच्या डोंगरातून उगम पावणारी मुखी गोवरी नदी सध्या दूषित पाण्याने भरलेली आहे. रासायनिक पाणी थेट नदीत सोडल्यामुळे नदीच्या पात्रात मोठ्या प्रमाणावर मृत माशांचा खच नुकताच पाहायला मिळाला. नदीच्या किनारी असलेल्या कारखान्यातील पाणी थेटनदीत सोडले जात आहे.
नदीचे पाणी रसानामुळे दूषित झाल्यामुळे याचा फटका शेतीला तर होणार आहेच. परंतु या नदीच्या पाण्यामध्ये अनेक गुरेही पाणी पिण्यास येतात. या नदीच्या १५ ते १७ किमीच्या अंतरात असलेल्या गावात या नदीचे पाणी शेती आणि गुरांसाठी वापरले जाते. या प्रदुषित पाण्यामुळे धोका वाढला आहे.