कंपनीला १० दिवसात भूखंड तर महिन्याभरात १२० कोटी रुपयांचे कर्ज मंजूर
अभिनेता रितेश देशमुख आणि जीनिलीया देशमुख हे अडचणीत आले आहेत. रितेश आणि जीनिलीया यांच्या कंपनीसाठी अवघ्या १० दिवसात लातूर एमआयडीसीत भूखंड मंजूर करण्यात आला आहे. तसेच त्यांच्या देश अॅग्रो प्रा. लिमिटेड या कंपनीला महिन्याभरातच तब्बल १२० कोटी रुपयांचे कर्जही मंजूर झालं आहे. यासंबंधी लातूर भाजपच्या जिल्हाध्यक्षांनी पत्रकार परिषद घेऊन यासंबंधित आरोप केले आहेत.
रितेश देशमुख आणि जीनिलीया देशमुख यांच्या देश अॅग्रो प्रा. लिमिटेड या कंपनीला लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने कर्ज मंजूर केले आहे. तसेच कंपनीसाठी अवघ्या १० दिवसात लातूर एमआयडीसीत भूखंड मंजूर करण्यात आला आहे. पण त्यांना कोणत्या निकषावर १२० कोटींच्या कर्जाचा पुरवठा केला आणि त्यामध्ये एवढी तत्परता कशी दाखवली असे प्रश्न उपस्थित होत आहेत. लातूर एमआयडीसी भागात २०१९ पासून भूखंडासाठी १६ उद्योजकांची प्रतीक्षा यादी असताना त्यांना का डावलण्यात आलं असा प्रश्न आता निर्माण झाला आहे.
हे ही वाचा:
‘ठाकरे कुटुंबियांचे उत्पन्न आणि संपत्तीचा मेळ लागत नाही’
युक्रेनवरील रशियन हवाई हल्ल्यात चार ठार
पीएफआयला राम मंदिर पाडून बाबरी मस्जिद बांधायची होती
पूजा चव्हाणसाठी मी लढत असताना भास्करशेठ तुम्ही कुठल्या बिळात लपला होतात?
या प्रकरणी भाजपाचे आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “लातूर येथील सहकारी बँक ही एका कुटुंबाच्या मालकीची असल्यासारखा हा सर्व व्यवहार सुरू आहे. लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने शेतकऱ्यांना पाच लाख रुपये कर्ज देण्याचे घोषणा केली होती. त्याची अंमलबजावणी अद्यापही झालेली नाही. मात्र, कुटुंबातील व्यक्तीच्या खाजगी उद्योगाला १०० कोटी पेक्षा जास्त कर्ज अवघ्या काही दिवसात दिल जात आहे,” अशी टीका करण्यात आली आहे.