महाराष्ट्रात एन्फ्लूएंझा विषाणूचा धोका झपाट्याने वाढत आहे. गेल्या आठवडाभरात २ रुग्णांचा मृत्यू झाला असल्याचे सांगण्यात येत आहे. या दोन्ही रुग्णांचा मृत्यू केवळ इन्फ्लूएंझा विषाणूमुळे झाल्याचा संशय डॉक्टरांनी व्यक्त केला आहे.हे दोन्ही रुग्ण एन्फ्लूएंझा पॉझिटिव्ह होते. नागपूर आणि अहमदनगर मध्ये दोन मृत्यू झाले आहेत. पुणे जिल्ह्यातही एन्फ्लूएंझा विषाणूचा संसर्ग वाढत असल्याचे सांगण्यात येत आहे. गेल्या काही आठवड्यांपासून देशातील अनेक राज्यांमध्ये सतत वाढत असलेल्या संसर्गामध्ये एन्फ्लूएंझा विषाणूमुळे देशात चार रुग्णांचा मृत्यू झाला असल्याचे सांगण्यात येत आहे.
अहमदनगर जिल्ह्यातील एका खासगी वैद्यकीय महाविद्यालयात शिकणाऱ्या २३ वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाला आहे. एन्फ्लूएंझा विषाणूमुळे विद्यार्थ्याचा मृत्यू झाला असावा असा संशय डॉक्टरांनी व्यक्त केला आहे. तरुणावर गेल्या अनेक दिवसांपासून कोविडवर उपचार सुरू होते.त्याचा एन्फ्लूएंझा अहवालही पॉझिटिव्ह आला असल्याचे डॉक्टरांनी म्हटले आह. रक्ताचे नमुने तपासणीसाठी मुंबईला पाठवण्यात आले असून सविस्तर अहवाल येणे बाकी आहे.या रुग्णाचा एन्फ्लूएंझा अहवालही पॉझिटिव्ह आला आहे.
नागपुरमध्ये ९ मार्च रोजी ७८ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू इन्फ्लूएंझा विषाणूमुळे झाला असल्याचा डॉक्टरांना संशय आहे. अनेक दिवसांपासून मृतावर नागपुरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते.रुग्णाला क्रॉनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह पल्मोनरी डिसीज तसेच शुगर आणि ब्लड प्रेशरसारखे इतर आजार होते, ज्यावर उपचार सुरू होते. तपासणीत एन्फ्लूएंझा रिपोर्ट पॉझिटिव्ह आढळला. त्यामुळेच मृत्यूचे कारण एन्फ्लूएंझा विषाणू असल्याचा संशय डॉक्टरांना आहे.
हेही वाचा :
अयोध्येच्या राम मंदिरासाठी दणदणीत देणग्या
‘नुक्कड’ फेम समीर खक्कर यांचे रुग्णालयात निधन
इम्रान खान यांच्या अटकेच्या तयारीमुळे पाकिस्तानात घमासान
चीन-पाक निर्मित JK 17 एअरक्राफ्ट खराब, म्यानमारला केला जात होता पुरवठा
पुणे जिल्ह्यातही एन्फ्लूएंझा पसरत असून तो मुलांसाठी धोकादायक ठरत आहे. पाच वर्षांखालील मुले एन्फ्लूएंझाच्या विळख्यात येत आहेत. या बहुतेक मुलांना श्वास घेण्यास त्रास होत आहे. बाधित मुलांवर अँटीबायोटिक काम करत नसल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. जिल्ह्यातील आयसीयूमध्ये रुग्णाची संख्या वाढत आहे .