मुंबईतील खाड्या आक्रसताना दिसत आहेत, ही बाब नुकतीच समोर आलेली आहे. १९९० ते २०१९ मध्ये केलेल्या उपग्रह प्रतिमांच्या अभ्यासानुसार मुंबईमधील खाड्या आक्रसताना दिसत आहेत. त्यामुळेच आता मुंबई, ठाणे, नवी मुंबई, उरण अशा अनेक भागात पुराचा धोका निर्माण झाला आहे. यामध्ये कोकणातील काही भागांचाही समावेश आहे. बीएनएचएसचे माजी संचालक डॉ. दीपक आपटे यांनी हे अभ्यासांती जाहीर केले.
खाडीमध्ये गाळ वाढल्यामुळे मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि उरणसह जलमार्गाची रुंदी कमी झालेली आहे. हवामान बदलांमुळे समुद्राची वाढती पातळी ही भविष्यात चिंता वाढवणारी आहे. अभ्यासामध्ये प्राथमिक निष्कर्षांवरून असे दिसून आले की, मागील ३० वर्षांमध्ये किनारपट्टीच्या परिसंस्थेमध्ये वेगाने बदल झालेला आहे.
हे ही वाचा:
इथेनॉल २१ व्या शतकातील भारताची प्राथमिकता
रा.स्व. संघाच्या अनेक नेत्यांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर ट्विटरचा वार
फेसबुकने ट्रम्पवर घातली २ वर्षांची बंदी
बीडमध्ये कितीही हजार पोलिसांचा बंदोबस्त असला, तरी मोर्चा निघणार
यावर अधिक बोलताना आपटे म्हणाले, “खाडींचे क्षेत्र कालांतराने खारफुटीच्या जंगलात रुपांतरीत होईल. त्यामुळे भविष्यात पुराचा धोकाही संभवतो. वादळ तसेच पावसाच्या पाण्याचा निचरा होण्याची क्षमता कमी होईल त्यामुळे पुराची भीती डोक्यावर कायम राहणार आहे. विशेषत: ठाणे खाडीसारख्या भागात फ्लेमिंगोच्या अधिवासावर याचा परिणाम होणार आहे.
संकुचित खाडी ही कोणत्याही शहरासाठी चांगली नाही. पावसाळ्यात नाल्यांची क्षमता लक्षणीय घटेल आणि त्यामुळे या जास्त पूर येईल. मुसळधार पाऊस आणि समुद्रातील भरतीचे पाणी शहरात घुसण्याची चिन्हे अधिक असणार आहेत. समुद्राची पातळी वाढल्यामुळे हा धोका अधिक गंभीर झाला आहे.
इंडियन एज्युकेशन ऑफ ट्रॉपिकल मॅनेजमेंटचे शास्त्रज्ञ कोल यांच्या मते प्रत्येक दहा वर्षांनी समुद्राच्या पातळीत ३ सेमी वाढ होते. येत्या काळात ती ५ सेमी होईल.