ऋषी सुनक यांची पत्नीसह अक्षरधाम मंदिराला भेट !

जी20 परिषदेनिमित्त भारतात आले असताना घेतले दर्शन

ऋषी सुनक यांची पत्नीसह अक्षरधाम मंदिराला भेट !

जी २० शिखर परिषदेच्या दुसऱ्या दिवशी, रविवारी ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांनी दिल्लीच्या अक्षरधाम मंदिराला भेट दिली. त्यांच्यासोबत त्यांची पत्नी अक्षता मूर्तीही होत्या. यापूर्वी ८ सप्टेंबर रोजी, सुनक यांनी आपल्या ‘हिंदू’ मुळांबद्दल अभिमान व्यक्त केला होता. तसेच, मंदिराला भेट देऊन आनंद व्यक्त केला.

‘मी एक अभिमानी हिंदू आहे. मी जसा मोठा झालो, तसाच मी आहे. आमच्याकडे नुकतेच रक्षाबंधन झाले. माझ्या बहिणींकडून आणि चुलत बहिणींकडून मला राख्या बांधण्यात आल्या. त्या सर्व राख्या माझ्याकडे आहेत. मला जन्माष्टमी साजरी करायला वेळ मिळाला नाही. परंतु यावेळी मला मंदिराला भेट देण्याची संधी मिळाल्यास मी त्याची भरपाई करू शकतो,’ असे त्यांनी एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले होते.

हे ही वाचा:

शिक्षक आणि पालकांनी चारित्र्यसंपन्न पिढी घडविण्यासाठी योगदान द्यावे

पोटनिवडणुकांत भाजपने दाखवली ताकद

ईरशाळवाडी दुर्घटनेत शोध न लागलेल्या ५७ व्यक्तींच्या नातेवाईकांना सानुग्रह अनुदान देणार

मोरोक्कोत विध्वंस, ३०० मृत्यू

ब्रिटनच्या पंतप्रधानांच्या अक्षरधाम मंदिराच्या भेटीच्या पार्श्वभूमीवर चोख सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली असल्याचे दिल्ली पोलिसांनी सांगितले. मंदिर आणि परिसरात सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली होती. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये ब्रिटनच्या पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर पंतप्रधान म्हणून सुनक यांचा हा पहिलाच भारत दौरा आहे.
याआधी ९ सप्टेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताच्या अध्यक्षतेखाली नवी दिल्लीत होणाऱ्या जी २० शिखर परिषदेच्या पार्श्‍वभूमीवर ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांच्या सोबत द्विपक्षीय बैठक घेतली. शिखर परिषदेचे ठिकाण असलेल्या प्रगती मैदानातील ‘भारत मंडपम’ येथे दोन्ही नेत्यांची भेट झाली.

दोन्ही नेते जी २० शिखर परिषदेदरम्यान ‘वसुधैव कुटुंबकम’ वरील पहिल्या सत्रातही सहभागी झाले होते. ‘नेतृत्व प्रदान करण्यासाठी जग जी २० कडे पाहात आहे आणि नेते मोठ्या आव्हानांच्या क्षणी भेटत आहेत. नेते एकत्रितपणे आव्हानांना तोंड देऊ शकतील,’ असा विश्वास सुनक यांनी व्यक्त केला.

Exit mobile version