ब्रिटिश पंतप्रधान ऋषी सुनक यांनी गृहमंत्री ब्रेव्हरमनना हाकलले!

लंडनची पोलीस यंत्रणा पॅलेस्टाईन धार्जिणी असल्याचा केला होता आरोप

ब्रिटिश पंतप्रधान ऋषी सुनक यांनी गृहमंत्री ब्रेव्हरमनना हाकलले!

ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांनी गृहमंत्री सुएला ब्रेव्हरमन यांची गृहमंत्री पदावरुन हकालपट्टी हकालपट्टी केली आहे.लंडनच्या ‘द टाइम्स’ या वृत्तपत्रात सुएला ब्रेव्हरमन यांनी एक लेख लिहिला होता.सुएला ब्रेव्हरमन यांनी या लेखात आरोप केला होता की, लंडनची पोलीस यंत्रणा पॅलेस्टाईन धार्जिणी आहे.तसेच येथील यंत्रणेला कायदा सुव्यवस्थेची चिंता नाही असंही लेखात म्हटलं होतं.मात्र, सुएला ब्रेव्हरमन यांचा हा लेख त्यांना चांगलाच भारी पडला आहे.

सुएला ब्रेव्हरमन यांनी द टाइम्समध्ये लेख लिहून पोलिसांवर आणि पोलीस यंत्रणेवर आरोप केला त्यानंतर विरोधकांनी त्यांच्या विरोधात कारवाईची मागणी केली होती. लंडनमधल्या रस्त्यावर उतरुन टीकाकारांनी आणि विरोधकांनी सुएला ब्रेव्हरमन यांच्या विरोधात निदर्शनं केली होती. त्यानंतर आता ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांनी मंत्रिमंडळात फेरबदल केले आहेत. त्याचवेळी त्यांनी सोमवारी सुएला ब्रेव्हरमन यांची गृहमंत्रीपदावरुन हकालपट्टी केली आहे.
यूकेच्या सर्वात वरिष्ठ मंत्र्यांपैकी एक सुएला ब्रेव्हरमन म्हणून मानल्या जातात.

हे ही वाचा.. 

दागिन्यांच्या जाहिरातींसाठी नवीन सेलिब्रिटी मिळवण्यात कंपन्यांच्या नाकी नऊ!

कर्नाटकमध्ये तीन मुलांसह मातेची भोसकून हत्या

पंजाबमध्ये १०० गाड्या एकमेकांवर धडकल्या

रस्ता अडवणाऱ्या दोघांनी हॉर्न वाजवणाऱ्या कॉलेज विद्यार्थ्याला केली जबर मारहाण

गृहमंत्री पदावरून हटवल्यानंतर ब्रेव्हरमन यांनी एका निवेदनात म्हणाल्या, “गृहसचिव म्हणून काम करणे हा माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा विशेषाधिकार आहे. योग्य वेळ आल्यावर मला आणखी काही सांगायचे आहे, असे ब्रेव्हरमन यांनी निवेदनात म्हटले आहे.

सुएला ब्रेव्हरमन यांची गृहमंत्रीपदावरून हकालपट्टी केल्यानंतर ब्रिटनचे परराष्ट्र मंत्री जेम्स क्लेव्हरली यांना गृहमंत्रालयाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.तसेच डेव्हिड कॅमेरून यांच्याकडे परराष्ट्र मंत्रालयाची जबाबदारी देण्यात आली आहे.

 

Exit mobile version