प्रभू श्रीरामाचे मंदिर येत्या काळात संपूर्ण तयार होत असल्यामुळे ज्या अयोध्येकडे जगाचे लक्ष लागून राहिले असले तरी त्याआधी अयोध्या आणखी एका कारणासाठी चर्चेत आली आहे, ती म्हणजे इंडियन आयडल या संगीत कार्यक्रमाच्या विजेत्यामुळे. ऋषी सिंह याने इंडियन आयडल १३ या स्पर्धेचे विजेतेपद पटकाविले त्यामुळे अयोध्येत जल्लोष सुरू आहे. ऋषी सिंह हा अयोध्येचा रहिवासी आहे. त्यामुळे अयोध्येत उत्सव साजरा होत आहे.
ऋषी सिंहला लहानपणापासूनच गाणी गाण्याची आणि लिहिण्याची आवड आहे. महत्त्वाची बाब म्हणजे तो त्याच्या आई-वडिलांचा दत्तक मुलगा आहे, याचा खुलासा खुद्द ऋषीनेच शोमध्ये केला होता. तो सध्या डेहराडूनमधील हिमगिरी जी विद्यापीठातून त्याचं शिक्षण पूर्ण करत आहे. ‘इंडियन आयडॉल १३’ मध्ये सहभागी होण्याआधी मंदिर आणि गुरुद्वारामध्ये गाणं गात असे. त्याला लहानपणापासूनच संगीताची आवड आहे.
छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय सिंगिंग रिऍलिटी शो अर्थात ‘इंडियन आयडॉल १३’ पर्वाचा ऋषी सिंह विजेता ठरला. ऋषी सिंहला ‘इंडियन आयडॉल १३’च्या ट्रॉफीसह २५ लाख रुपये आणि मारुती सुझुकी एसयूव्ही ही कार बक्षीस मिळाली आहे. सोशल मीडियावरून ऋषीवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. ऋषी सिंह हा मूळचा अयोध्या, उत्तर प्रदेश येथील आहे. त्याला सोनी म्युझिक इंडियाबरोबर रेकॉर्डिंगचे कॉन्ट्रक्ट देखील मिळाले आहे.
हे ही वाचा:
चौथ्यांदा जीएसटी संकलनाने चौथ्यांदा केला १. ५ लाख कोटी रुपयांचा टप्पा पार
संजय शिरसाट म्हणतात, अशोक चव्हाण भाजपात जातील!
चोर म्हणण्याचे स्वातंत्र्य फक्त राऊत यांनाच हवे!
दादर स्टेशनबाहेरच्या नारळवाल्यांना ‘नारळ’ कोण देणार?
‘इंडियन आयडाॅल’च्या १३ व्या पर्वाचा ग्रँड फिनाले रविवारी (२ एप्रिल) मोठ्या दिमाखात पार पडला. यात ‘अव्वल ६’ स्पर्धकांमध्ये ऋषी सिंहसह बंगालची सोनाक्षी कर, गुजरातचा शिवम शाह, जम्मूतील चिराग कोतवाल, देबोस्मिता राॅय, बिदिप्ता चक्रवर्ती हे प्रतिस्पर्धी होते. ट्रॉफी पटकावण्यासाठी या स्पर्धकांमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळाली. अखेर या सर्वांना मागे टाकत ऋषीने ‘इंडियन आयडॉल १३’च्या ट्रॉफीवर आपले नाव कोरले. ऋषीनंतर देबोस्मिता दुसरी (फर्स्ट रनर अप) आणि चिरागने तिसरा क्रमांक (सेकंड रनर अप) पटकावला. त्यांना ट्रॉफीसह पाच लाख रुपयांचा धनादेश मिळाला आहे. ‘इंडियन आयडॉल १३’च्या या पर्वाचे नेहा कक्कर, हिमेश रेशमिया आणि विशाल ददलानी हे परीक्षक आणि आदित्य नारायण हे होस्ट होते. त्यामुळे हे पर्व खूपच विशेष होते.
मला स्वप्नवत वाटत आहे!
‘इंडियन आयडॉल १३’चा विजेता झाल्यानंतर ऋषी म्हणाला, इंडियन आयडॉल १३’चा मी विजेता झालो आहे, यावर माझा विश्वास बसत नाही. हे सगळं मला स्वप्नवत वाटत आहे. मला अभिमान आहे की, माझा जन्म हा प्रभू रामचंद्र यांच्या अयोध्येत झाला आहे. या महत्त्वाच्या शोचा वारसा पुढे नेणे माझ्यासाठी सन्मानाची गोष्ट आहे. मी चॅनल, जज आणि इंडियन आयडॉलच्या संपूर्ण टीमचा आभारी आहे.