रिषभ पंत ग्लव्होज काढून आयपीएल खेळणार!

दिल्ली कॅपिटल्सने केली घोषणा

रिषभ पंत ग्लव्होज काढून आयपीएल खेळणार!

आयपीएलच्या पुढील हंगामाचे म्हणजेच आयपीएल २०२४ चे वेळापत्रक जाहीर होऊन काउंटडाऊन सुरू झाले आहे. मात्र, देशातील लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केवळ पहिल्या १७ सामन्यांचे वेळापत्रक समोर आले आहे. आता निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यानंतरच उर्वरित सामन्यांचे वेळापत्रक जाहीर केले जाणार आहे. दरम्यान, दिल्ली कॅपिटल्सने ऋषभ पंतबाबत मोठं वक्तव्य केलं आहे.

आयपीएलच्या पहिल्या टप्प्यात दिल्ली कॅपिटल्सला सात सामने खेळायचे आहेत. लीगचे वेळापत्रक जाहीर झाल्यानंतर फ्रँचायझीचे मालक पार्थ जिंदाल यांनी ऋषभ पंतबद्दल एक मोठी गोष्ट समोर आणली आहे. आयपीएल २०२४ च्या पहिल्या टप्प्यात म्हणजेच संघाच्या पहिल्या सात सामन्यांमध्ये कर्णधार पंत विकेटकीपिंग करणार नाही.

हेही वाचा :

संदेशखालीत शाहजहान शेखच्या भावाची मालमत्ता ग्रामस्थांनी जाळली, पुन्हा हिंसाचार!

संदेशखाली वादात शाहजहान शेखवर मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल!

युक्रेन-रशिया संघर्षापासून दूर राहा

युक्रेन-रशिया संघर्षापासून दूर राहा

पार्थ जिंदाल पंतच्या फिटनेसबाबत म्हणाले की, तो संपूर्णपणे फिट दिसत आहे. अपघातानंतर तो व्यावसायिक क्रिकेटपासून दूर आहे. मात्र त्याने काही सराव सामने खेळले आणि यष्टीरक्षणाचा सरावही केला आहे.

दिल्ली कॅपिटल्सचे मालक पार्थ जिंदाल यांनी सांगितले की, रिषभ पंत फलंदाजी करत आहे. त्याने यष्टीरक्षणाचाही सराव केला आहे. आयपीएल २०२४ पूर्वी तो नक्कीच फिट असावा. तो आयपीएल २०२४ चा पहिला सामना खेळेल आणि तो सुरुवातीपासूनच संघाचा भाग असेल.

पार्थ जिंदाल पुढे म्हणाले की,  पहिल्या सात सामन्यांत पंतला फलंदाज म्हणून खेळवू. या दरम्यान तो विकेटकीपिंग करणार नाही. रिषभ पंतच्या आगमनामुळे संघ आता खूप मजबूत झाला आहे. आमचा एक मजबूत संघ आहे. दिल्ली कॅपिटल्सचा पहिला सामना २३ मार्च रोजी मोहालीत पंजाब किंग्जविरुद्ध होणार आहे.

Exit mobile version