अपघातातून सावरलेला ऋषभ पंत होतोय तंदुरुस्त

पंतचे सामर्थ्य, लवचिकता आणि धावण्याची क्षमता जोखली जात आहे

अपघातातून सावरलेला ऋषभ पंत होतोय तंदुरुस्त

भारतीय क्रिकेटपटू ऋषभ पंत याच्या फिटनेसमध्ये लक्षणीय प्रगती होत असून त्याने नेट्समध्ये फलंदाजी आणि यष्टीरक्षणाचा सरावही सुरू केल्याची माहिती भारतीय क्रिकेट नियंत्रण मंडळ (बीसीसीआय)ने शुक्रवारी दिली. गेल्या वर्षी ३० डिसेंबर रोजी त्याच्या गाडीला मोठा अपघात झाला होता. त्यानंतर त्याच्या पायावर शस्त्रक्रिया करावी लागली होती.

‘ऋषभ सध्या दुखापतीतून सावरत आहे. त्याच्याकडून सध्या विशिष्ट प्रकारचे व्यायाम करवून घेतले जात आहेत. त्यात त्याचे सामर्थ्य, लवचिकता आणि धावण्याची क्षमता जोखली जात आहे,’ अशी माहिती बीसीसीएलचे सचिव जय शहा यांनी दिली. बीसीसीआयने यावेळी अन्य फिट नसणाऱ्या खेळाडूंच्या सद्यस्थितीबाबतही माहिती दिली.

 

सध्या जसप्रीत बुमराह, के. एल. राहुल, श्रेयस अय्यर आणि प्रसिध कृष्णा हे बेंगळुरूतील नॅशनल क्रिकेट अकॅडमीमध्ये सराव करत आहेत. राहुल आणि श्रेय यांनी नेट्समध्ये सरावाला सुरुवात केली आहे तसेच, त्यांच्याकडून विशिष्ट प्रकारचे व्यायाम करवून घेतले जात आहेत.

हे ही वाचा:

‘मोबाइल टॉवरमुळे कर्करोग होण्याची भीती निराधार’

यवतमाळमध्ये पुरात ४५ जण अडकले

जेजुरीच्या खंडोबा मंदिरात उधळली जाणारी हळद ‘सेंद्रिय’ असावी!

महिला सुरक्षेबाबत स्वत:च्याच सरकारवर प्रश्नचिन्ह; राजस्थानच्या मंत्र्याची हकालपट्टी

‘बीसीसीएलचे वैद्यकीय पथक त्यांच्या या प्रगतीने समाधानी आहेत. आगामी काळात त्यांचे कौशल्य आणि सामर्थ्य जोखणाऱ्या कसरती त्यांच्याकडून करवून घेतल्या जातील,’ अशीही माहिती त्यांनी दिली. तर, बुमराह आणि कृष्णा हे दुखापतीतून सावरत आहेत आणि नेट्समध्ये कसून सराव करत आहेत. आता एनसीएतर्फे आयोजित काही सराव सामन्यांमध्येही ते खेळतील. सद्यस्थितीत बीसीसीएलचे वैद्यकीय पथक त्यांच्या प्रगतीने समाधानी असून त्यांचा सराव सामन्यातील खेळ बघूनच अंतिम निर्णय घेतला जाणार आहे,’ असेही सांगण्यात आले आहे.

Exit mobile version