सिनिअर खेळाडूंना बाजूला सारत दिल्ली कॅपिलल्सच्या कर्णधारपदी युवा खेळाडू रिषभ पंतच्या नावाची घोषणा झाली आहे. दिल्ली कॅपिटल्सचा दिग्गज खेळाडू आणि कर्णधार श्रेयस अय्यर दुखापतग्रस्त असल्याने त्याच्या ऐवजी रिषभ पंतवर संघाच्या कर्णधापदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. रहाणे, धवन, स्मिथ, अश्विन अशा एकापेक्षा एक दिग्गज खेळाडूंना पछाडत पंतने बाजी मारली आहे.
दिल्ली कॅपिटल संघात शिखर धवन, स्टीव्ह स्मिथ, अजिंक्य रहाणे आणि रविचंद्रन अश्विन सारखे सिनिअर खेळाडू असूनही रिषभ पंतला दिल्लीचं कर्णधारपद देण्याचा निर्णय संघ व्यवस्थापनाने घेतला आहे.
श्रेयस अय्यर दुखापतग्रस्त झाल्यानंतर दिल्लीच्या कर्णधारपदी कोण, असा मोठा प्रश्न होता. अजिंक्य रहाणे, शिखर धवन, रवीचंद्रन अश्विन, स्टीव्ह स्मिथ अशी दिग्गज नावं दिल्लीच्या कर्णधारपदाच्या शर्यतीत होती. परंतू या सगळ्या नावांना पिछाडीवर टाकत संघ व्यवस्थापनाने आणि दिल्लीच्या संघाने रिषभचा फॉर्म पाहता त्याच्यावर विश्वास टाकला आहे.
हे ही वाचा:
दिल्लीच्या सीमांवर आंदोलकांची उपस्थिती कमी व्हायला सुरूवात
राठोड, देशमुख यांच्यानंतर आव्हाडांचा नंबर?
औरंगाबादमधील लॉकडाऊन रद्द; इम्तियाज जलिल यांच्या मिरवणुकीत कोरोना नियमांचा फज्जा
नव्या जबाबदारीसंबंधी बोलताना रिषभ म्हणाला, “दिल्ली जिथे मी वाढलो, जिथे सहा वर्षांपूर्वी मी आयपीएलचा माझा प्रवास सुरु केला, त्याच संघाचा एक दिवस कर्णधार व्हायचं, असं माझं स्वप्न होतं. ते स्वप्न आज प्रत्यक्षात उतरलंय. मी सन्मानित झाल्याचं फिलिंग अनुभवतोय.”