31 C
Mumbai
Thursday, January 9, 2025
घरविशेषएकेकाळी सिलिंडर उचलणाऱ्या रिंकूने आयपीएलमध्ये शिवधनुष्य उचलले

एकेकाळी सिलिंडर उचलणाऱ्या रिंकूने आयपीएलमध्ये शिवधनुष्य उचलले

कोलकाता नाइट रायडरचा हा खेळाडू पाच चेंडूंत पाच षटकार लगावल्यामुळे एका रात्रीत स्टार झाला

Google News Follow

Related

कोलकाता नाईट रायडर्सच्या रिंकू सिंग या उत्तर प्रदेशच्या फलंदाजाने जबरदस्त कामगिरीचे प्रदर्शन केले. गुजरातविरुद्धच्या सामन्यात अखेरच्या षटकात २९ धावा हव्या असताना त्याने पहिल्या पाच चेंडूत पाच षटकार लगावून आपल्या संघाला अशक्यप्राय असा विजय मिळवून दिला. त्यानंतर आता रिंकू सिंग हा सगळीकडे ट्रेंडिंगमध्ये आहे.

वडिलांसोबत सिलिंडर उचलण्याचे काम तो करत असे. ते काम त्याला पसंत नव्हते. डोळे क्रिकेटकडे लागलेले असत. पण वडिलांना आवडत नाही तर कशाला क्रिकेट खेळतोस असे म्हणत वडिलांसोबतच काम करण्याची सूचना आईने केली. मात्र याच रिंकू सिंगने क्रिकेटकडे लक्ष केंद्रित केले आणि आज तो देशात लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचला आहे.

एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत रिंकूने गुजरातविरुद्धच्या त्या सामन्यातील अखेरच्या षटकाचे वर्णन केले. तो म्हणाला की, उमेश यादवने मला नेहमीसारखाच खेळ करण्यास सांगितले. काही वेगळे करण्याची गरज नाही, असे तो म्हणाला. त्याप्रमाणे, चेंडू आला तसा मारत गेलो. एकाच ठिकाणी मारायचे असे काही ठरविले नव्हते.

ज्या यश दयाळच्या गोलंदाजीवर त्याने ही फटकेबाजी केली तो त्याचा मित्र आहे. सामना झाल्यावर त्याला मेसेज केला. त्यानेही शुभेच्छा दिल्या. क्रिकेटमध्ये असे होतच असते. रिंकू सिंग अशा दडपणाखालील परिस्थितीत चांगला खेळ करतो. रणजीमध्येही तो ५-६व्या क्रमांकावर खेळतो आणि तिथेही अशी परिस्थिती असल्यावर त्याचा खेळ बहरतो.

रिंकू हा मूळचा अलिगढचा आहे. आपल्या या खडतर प्रवासाबद्दल तो म्हणतो की, परिवाराची परिस्थितीत ठीक नव्हती. वडिलांना क्रिकेट आवडत नव्हते. सिलिंडर उचलून नेण्याचे काम करत असू. भावासोबत तो काम करत असलेल्या ट्यूशन क्लासमध्ये जात असे. तिथे सफाईचे काम करत असे. पण त्या कामाचा कंटाळा आला.

हे ही वाचा:

देशात यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस पडेल!

शिवसेनाभवन, शिवसेनेचा निधी, शाखा एकनाथ शिंदेंना सोपवा!; सर्वोच्च न्यायालयात याचिका

शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही ! हवालदिल बळीराजाला मुख्यमंत्र्यांचा दिलासा

पावसापासून बचाव करण्यासाठी ते शेडखाली उभे होते, पण झाडाने जीव घेतला

सुरेश रैना हा रिंकू सिंगचा आदर्श आहे. त्याच्याप्रमाणेच तो ५-६व्या क्रमांकावर येतो आणि डावखुराही आहे.

आयपीएलमध्ये त्याला ८० लाखांची बोली लागली. नवे घर घ्यायचे त्याचे स्वप्न आहे. बहिणीचे लग्नही करायचे आहे. इतके पैसे कधी बघितलेले नाहीत. पाच षटकार लगावून कोलकाता संघाला विजय मिळवून दिल्यानंतर रात्री झोप येत नव्हती. झोपेची गरज होती पण या कामगिरीमुळे झोप उडालीही होती. कोलकात्याचा मालक आणि सुप्रसिद्ध अभिनेता शाहरुखने व्हीडिओ कॉल केला. अभिनंदन केले. पण त्यांच्याशी काय बोलू असा प्रश्न रिंकू सिंगसमोर होता. तो लाजत होता. त्यांच्याशी मनमोकळेपणाने तो बोलू शकला नाही.

या कामगिरीमुळे सध्या तो चर्चेत आहे. भारतासाठी खेळणे हे त्याचे स्वप्न आहे. पण तूर्तास आयपीएलमधील आपल्या संघाला जिंकून देता येईल यासाठी तो प्रयत्न करणार आहे.

 

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
220,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा