आयपीएलसारख्या स्पर्धेत काय होईल हे सांगता येत नाही. गुजरात टायटन्स आणि कोलकाता नाइट रायडर्स या सामन्यात अशीच कलाटणी मिळाली.
गुजरातने प्रथम फलंदाजी करताना ४ बाद २०४ धावा करत कोलकात्यासमोर मोठे आव्हान उभे केले होते. त्यातच १७व्या षटकात गुजरातच्या रशिद खानने पहिल्या तीन चेंडूंवर हॅट्ट्रिक नोंदवून कोलकात्याच्या आव्हानाला खिंडार पाडले. ४ बाद १५५ वरून कोलकाता ७ बाद १५७ अशा वाईट अवस्थेत होता. तेव्हा कोलकात्याला विजयासाठी १८ चेंडूंत ४८ धावा करायच्या होत्या. १८व्या षटकांत तर केवळ ५ धावा मिळाल्यामुळे कोलकात्यासमोर धावांचा डोंगर उभारण्याचे आव्हान होते. अखेरच्या षटकात ६ चेंडूंत २९ धावा असे मोठे आव्हान असताना यश दयाळच्या गोलंदाजीवर रिंकू सिंगने दुसऱ्या चेंडूपासून सलग पाच षटकारांची आतषबाजी केली आणि क्षणार्धात सामन्याचे सारे चित्रच पालटून गेले.
त्याआधी, गुजरातने साई सुदर्शन (५३), विजय शंकर (६३), शुभमन गिल (३९) यांच्या जोरावर आपल्या संघाला ४ बाद २०४ धावांचा टप्पा गाठून दिला. त्याला उत्तर देताना कोलकाताची स्थिती १७व्या षटकात ५ बाद १५५ अशी झाली होती. तेव्हाच रशिद खानने कोलकात्याला मोठा तडाखा दिला.
यंदाच्या आयपीएल हंगामातील पहिल्या हॅट्ट्रिकची नोंद त्याने केली. ही हॅट्ट्रिक नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये झाली आहे. गुजरात टायटन्सच्या रशिद खानने ही कामगिरी करून दाखविली.
हे ही वाचा:
कर्नाटक स्पोर्टिंगने जिंकली पद्माकर तालीम शिल्ड
राहुल गांधी यांनी ओबीसी समाजाची माफी मागून प्रकरण संपवायला हवं होतं!
कर्नाटक स्पोर्टिंगने जिंकली पद्माकर तालीम शिल्ड
शेअर बाजारातल्याअव्वल १० पैकी ८ कंपन्यांच्या बाजार भांडवलात ८२,१६९ कोटी रुपयांनी वाढ
रशिद खान या सामन्यात हंगामी कर्णधार म्हणून खेळत असताना त्याने ही कामगिरी करून दाखविली. हार्दिक पंड्याच्या जागी तो कर्णधार म्हणून जबाबदारी पार पाडत होता. आंद्रे रसेल, सुनील नारायण, शार्दुल ठाकूर या कोलाकात्याच्या तीन फलंदाजांना त्याने टिपले. १७व्या षटकात त्याने ही कामगिरी करून कोलकात्याचे आव्हानच जवळपास त्याने संपुष्टात आणले होते.
त्याच्या अखेरच्या षटकासाठी तो मैदानात आला तेव्हा त्याच्या आधीच्या तीन षटकांत ३५ धावा दिल्या होत्या आणि एकही बळी त्याला नोंदविता आल्या नव्हत्या. कोलकाता नाइट रायडर्सने तेव्हा ४ बाद १५५ धावा केल्या होत्या.