मंत्र्यांच्या कामाचा ३ महिन्यांनी आढावा, परफॉर्मन्स चांगला नसल्यास देणार डच्चू!

मंत्री संजय शिरसाट यांची माहिती

मंत्र्यांच्या कामाचा ३ महिन्यांनी आढावा, परफॉर्मन्स चांगला नसल्यास देणार डच्चू!

महायुतीच्या आमदारांचा नुकताच मंत्री पदाचा शपथ सोहळा पार पडला. राज्याच्या राज्यपालांनी नवनिर्वाचित आमदारांना मंत्री पदाची शपथ दिली. शपथ सोहळ्यानंतर खाते वाटप कधी होणार आणि कोणाच्या पदरात कोणते खाते पडणार याकडे सर्वांचे लक्ष लागून होते. मात्र, अखेर काल (२१ डिसेंबर ) अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी खाते वाटप जाहीर करण्यात आले.

यामध्ये मुख्यमंत्री फडणवीसांना गृहखाते तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना नगरविकास आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे अर्थ खाते आले. तर उर्वरित मंत्र्यांना इतर खाते वाटप करण्यात आले. खाते वाटपानंतर काही मंत्री खुश तर योग्य खाते न मिळाल्याने काही मंत्री नाराज असल्याची चर्चा आहे. याच दरम्यान, शिवसेना शिंदे गटाचे मंत्री संजय शिरसाट यांनी मंत्री पदावरून मोठे वक्तव्य केले आहे.

मंत्री संजय शिरसाट म्हणाले, शिंदे-फडणवीस दर ३ महिन्यांनी मंत्र्यांच्या कामाचा आढावा घेणार आहेत. परफॉर्मन्स चांगला नसलेल्यांना मंत्री पदावरून काढण्यात येईल असे मंत्री शिरसाट म्हणाले. ते पुढे म्हणाले, आम्हाला जी खाती मिळाली आहेत, आम्ही निश्चित पणे चांगले काम करून दाखवू. जेवढे जास्त काम करता येईल तेवढे काम करू. कारण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दर ३ महिन्यांनी मंत्र्यांच्या कामाचा आढावा घेणार आहेत.

त्यामुळे काम करणे गरजेचे आहे. तसे झाले नाहीतर उपमुख्यमंत्री शिंदे यांनी स्पष्ट सांगितले की, ज्या मंत्र्यांचा परफॉर्मन्स चांगला नसेल मग त्याचा कालावधी ६ महिने अथवा १ वर्षाचा असो त्याचे चांगले काम नसेल तर त्याला मंत्री पदावरून काढण्यात येईल, असे मंत्री संजय शिरसाट यांनी सांगितले.

हे ही वाचा : 

पत्नीला पोटगी देताना आणली ८० हजार रुपयांची नाणी

‘देश प्रथम, बांगलादेशींवर उपचार करू नयेत’

वायनाडच्या बहिण भावाच्या विजयामागे जातीय मुस्लिम युती !

संभलमध्ये ४६ वर्षांपासून बंद असलेल्या मंदिरात भंडारा, भाविकांची गर्दी उसळली!

Exit mobile version