काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांचा मुलगा आणि सिद्धार्थ विहार ट्रस्टचे अध्यक्ष राहुल एम खर्गे यांनी बेंगळुरूमधील नागरी सुविधांच्या जागेसाठी पाच एकर जमीन देण्याची विनंती मागे घेतली आहे. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या पत्नी पार्वती यांनी म्हैसूर अर्बन डेव्हलपमेंट अथॉरिटीला १४ जागा परत केल्यानंतर राहुल खर्गे यांनी हा निर्णय घेतला आहे. यावरून भाजप नेते आमदार अतुल भातखळकर यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली आहे. जमीन परत करणे ही भ्रष्टाचाराची दिलेली कबुलीच असून काँग्रेसने देशाची कशी लूट केली त्याचे हे उत्तम उदाहरण असल्याचे म्हटले आहे.
भाजप आमदार अतुल भातखळकर ट्वीटकरत म्हणाले, ED ने गुन्हा दाखल केल्या बरोबर कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या पत्नी पार्वती यांनी ३० सप्टेंबर रोजी एकूण १४ भूखंड म्हैसूर अर्बन डेव्हलपमेंट ॲथॉरिटीला (मुडा) परत केले असून त्यापाठोपाठ काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या कुटुंबीयांच्या सिद्धार्थ विहार ट्रस्टला देण्यात आलेली ५ एकर जमीन कर्नाटक सरकारला परत करण्याचा निर्णय मल्लिकार्जुन खर्गे यांचा मुलगा राहुल एम खरगे यांनी घेतला आहे. जमीन परत करणे ही भ्रष्टाचाराची दिलेली कबुलीच आहे. काँग्रेसने देशाची कशी लूट केली त्याचे हे उत्तम उदाहरण आहे.
हे ही वाचा :
मुंबईहून उड्डाण करणाऱ्या एअर इंडियासह इंडिगोच्या दोन विमानांना बॉम्बची धमकी
बाबा सिद्दीकीच्या हत्येतील आरोपी अल्पवयीन नाही!
महायुती सरकारचा मोठा निर्णय; मुंबईकर झाले ‘टोल’मुक्त!
उत्तर प्रदेशमध्ये दुर्गा मूर्तीच्या विसर्जन मिरवणुकीत हिंसाचार; एकाचा मृत्यू
भाजप प्रवक्ते शहजाद पूनावाला यांनी देखील काँग्रेसचा संचार घेतला आहे. पूनावाला म्हणाले, भाजपने संपूर्ण घोटाळा उघड केल्यानंतरच सिद्धरामय्या यांच्या कुटुंबीयांनी जमीन परत केली. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांचा समाचार घेताना शहजाद पूनावाला म्हणाले की, आता मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या पावलावर पाऊल ठेवत खर्गे कुटुंबीयांनीही त्यांना केआयएडीबी अंतर्गत एरोस्पेस पार्कसाठी दिलेली पाच एकर जमीन परत करण्याचा निर्णय घेतला आहे. ते पुढे म्हणाले, ही जमीन अनुसूचित जातीच्या उद्योजकांसाठी होती. जमीन परत केल्याने मल्लिकार्जुन कुटुंबाचा गुन्हा संपणार नाही. त्यामुळे त्याचा भ्रष्टाचाराचा गुन्हा संपणार नाही.
ED ने गुन्हा दाखल केल्या बरोबर कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या पत्नी पार्वती यांनी ३० सप्टेंबर रोजी एकूण १४ भूखंड म्हैसूर अर्बन डेव्हलपमेंट ॲथॉरिटीला (मुडा) परत केले असून त्यापाठोपाठ काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या कुटुंबीयांच्या सिद्धार्थ विहार ट्रस्टला… pic.twitter.com/XOOGDj0F2W
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) October 14, 2024