32 C
Mumbai
Monday, December 16, 2024
घरविशेषसोनिया गांधींनी घेतलेली नेहरूंची पत्रे परत करा

सोनिया गांधींनी घेतलेली नेहरूंची पत्रे परत करा

पीएम मेमोरियलने राहुल गांधींना लिहिले पत्र

Google News Follow

Related

पंतप्रधानांचे संग्रहालय आणि ग्रंथालय यांनी (PMML) भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी लिहिलेली वैयक्तिक पत्रे परत करण्याची औपचारिक विनंती केली आहे. ही पत्रे २००८ मध्ये यूपीए सरकारच्या काळात काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांना पाठवण्यात आली होती.

१० डिसेंबर रोजी लिहिलेल्या पत्रात, पीएमएमएल सदस्य रिझवान कादरी यांनी काँग्रेस खासदार राहुल गांधी यांना लिहिले की त्यांनी सोनिया गांधी यांच्याकडून मूळ पत्रे परत मिळवावी किंवा फोटोकॉपी, डिजिटल प्रती प्रदान करण्यात याव्या. सप्टेंबरमध्ये सोनिया गांधी यांनाही अशीच विनंती करण्यात आली होती.

अत्यंत ऐतिहासिक महत्त्वाची मानली जाणारी ही पत्रे सुरुवातीला १९७१ मध्ये जवाहरलाल नेहरू मेमोरिअलने नेहरू मेमोरियल म्युझियम आणि लायब्ररीकडे (आता पीएमएमएल) सोपवली होती. तथापि, ती ५१ बॉक्समध्ये पॅक करून २००८ मध्ये सोनिया गांधींना पाठवण्यात आली होती. या संग्रहात नेहरू आणि एडविना माउंटबॅटन, अल्बर्ट आइनस्टाईन, जयप्रकाश नारायण, पद्मजा नायडू, विजया लक्ष्मी पंडित, अरुणा असफ अली, बाबू जगजीवन राम आणि गोविंद बल्लभ पंत यांसारख्या प्रमुख व्यक्तींमधील पत्रव्यवहाराचा समावेश आहे.

हे ही वाचा : 

ईव्हीएमवर विश्वास नसेल तर निवडणुका लढवू नका! ओमर अब्दुल्लांचा काँग्रेसला सल्ला

३९ आमदारांनी घेतली मंत्रिपदाची शपथ, सर्वसमावेशक मंत्रिमंडळ

हिंदूंवरील अत्याचारा विरोधात मुलुंड चेकनाका ते विक्रोळीत ‘मानव शृंखला अभियान’

मुस्लिम बहुसंख्यांपेक्षा मोठे असू शकतात

नेहरूंची ही पत्रे भारतीय इतिहासाच्या महत्त्वाच्या कालखंडाची माहिती देत असल्याने त्याची नोंद ठेवणे आवश्यक आहे. त्यामुळेच ही पत्रे पीएमएमएलने संस्थेच्या संग्रहात परत येण्याची मागणी केली आहे. पीएमएमएलने पत्रात पत्रात म्हटले आहे की, “आम्ही समजतो की ही कागदपत्रे नेहरू कुटुंबासाठी वैयक्तिक महत्त्वाची असू शकतात. परंतु, पीएमएमएलचा विश्वास आहे की हे ऐतिहासिक साहित्य अधिक व्यापकपणे उपलब्ध करून दिल्यास विद्वान आणि संशोधकांना खूप फायदा होईल.”

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
214,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा