27 C
Mumbai
Saturday, December 28, 2024
घरविशेषराज्यातील सर्वच पोलीस स्टेशन बनल्येत वसुलीचे अड्डे

राज्यातील सर्वच पोलीस स्टेशन बनल्येत वसुलीचे अड्डे

Google News Follow

Related

आल्या दिवशी महाराष्ट्राच्या गृहविभागाच्या अब्रूची लख्तरे वेशीवर टांगली जात असताना निवृत्त पोलीस अधिकारी मीरा बोरवणकर यांनी पोलीस खात्यावर निशाणा साधत गंभीर आरोप केले आहेत. राज्यातील पोलीस स्टेशन हे वसुलीचे अड्डे बनल्याचा खळबळजनक दावा मीरा बोरवणकर यांनी केला आहे. राज्यातील सर्वच अधिकारी भ्रष्ट आहेत आणि पैसे खात नाही असा एकही अधिकारी नाही असे बोरवणकर यांनी म्हटले आहे.

अंबानी स्फोटक प्रकरणात पोलीस अधिकारी सचिन वाझेला अटक झाली तर मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी थेट गृहमंत्र्यांवरच महिना १०० कोटीचे टार्गेट दिल्याचा आरोप केला. या सगळ्यात गृह खात्याचा एक कुरूप चेहरा महाराष्ट्राच्या जनतेसमोर आला. खुद्द मुंबईचे नवे पोलीस आयुक्त हेमंत नागराळे यांनी देखील पोलिसांची प्रतिमा प्रचंड मलिन झाल्याचे मान्य केले. यातच आता निवृत्त पोलीस अधिकारी मीरा बोरवणकर यांनी पोलीस दलावर खळबळजनक आरोप केले आहेत.

हे ही वाचा:

उद्योजक आनंद महिंद्रांनी उद्धव ठाकरेंना फटकारले

संजय राऊतांवर ट्वीट करून शरद पवारांना आवाहन करण्याची वेळ

मंगल प्रभात लोढांच्या उपस्थितीत मालवणीत झाली रंगांची उधळण

वाझेचा साथीदार धनंजय गावडेची अटक आता अटळ

पोलीस दलातील प्रामाणिक कर्मचारी हा शोधून काढावा लागतो असे मत बोरवणार यांनी व्यक्त केले आहे. पोलीस दलात जवळपास सर्वच पोलीस अधिकारी गैरव्यवहार करतात. अनेक पोलीस ठाण्यात पैसा जमा केला जातो. प्रत्येक पोलीस स्टेशन हा पैसे कमावण्याचा अड्डा झाला आहे. प्रत्येक पोलीस स्टेशन राजकीय पक्षांची सोय असते. पोलीस दलात मोठ्या प्रमाणात राजकीय हस्तक्षेप आहे. पोलिसांच्या नियुक्त्या, बदल्या ह्या राजकीय वरदहस्तानेच होतात. लोकांनीच पुढाकार घेऊन आता प्रश्न विचारायला हवेत तरच परिस्थिती बदलेले असे मत बोरवणकर यांनी व्यक्त केले आहे. पोलीस खात्यातील राजकीय हस्तक्षेप थांबायलाच हवा असे बोरवणकर म्हणाल्या.

सचिन वाझे विषयातही बोरवणकर यांनी आपले मत व्यक्त केले. वाझे हा एकटा सगळं करूच शकत नाही. त्याच्या मागे मोठे पाठबळ आहे. क्राईम ब्रँच हे खंडणी वसुली केंद्र आहे असे मत त्यांनी व्यक्त केले. तर गृहमंत्री अनिल देशमुख ह्यांच्यावर झालेले आरोप गंभीर स्वरूपाचे आहेत आणि त्याची न्यायालयीन चौकशी व्हायला हवी असे मीरा बोरवणकर म्हणाल्या. एबीपी माझा या वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बोरवणकर यांनी विविध विषयांवर आपली भूमिका मांडली.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
217,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा