भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्या दरम्यान विश्वचषक स्पर्धेचा अंतिम सामना या रविवारी रंगणार आहे. त्यामुळे या सुपरसंडेसाठी सर्व कंपन्या सज्ज झाल्या आहेत. दिवाळीनंतर आलेल्या या छोट्या सोहळ्यासाठी सगळीकडे जय्यत तयारी सुरू झाली आहे.
बार आणि रेस्टॉरंट्सने प्रसिद्धीसाठी ब्लीड ब्लू शॉट्स आणि शामी व विराट मेनू दाखल केले आहेत. बहुतेक मित्रमंडळी एकत्रितपणे या अंतिम सामन्याचा आनंद लुटणार असल्यामुळे डिलिव्हरी करणाऱ्या कंपन्यांनी पुरवठादारांना सॉफ्ट ड्रिंक आणि स्नॅक्सचा पुरवठा करण्यास सांगितले आहे. चित्रपटगृहे आणि क्लबमध्येही मोठा पडदा लावून सामना लाइव्ह दाखवला जाणार आहे.
विशेष म्हणजे भारतीय संघाच्या जर्सीचे अधिकृत पुरवठादार अदिदासनेही या मोठ्या अनपेक्षित मागणीसाठी ठिकठिकाणी दुकाने उघडली आहेत. टीव्ही कंपन्या आणि किरकोळ दुकानांमध्येही मोठ्या स्क्रीनच्या टीव्ही सेट्सच्या मागणीत वाढ झाली आहे. गेल्या वर्षीच्या दिवाळीनंतरच्या कालावधीपेक्षा ही वाढ तब्बल ४० टक्के अधिक असल्याचे हे वाहतूकदार सांगतात. ‘इन्स्टामार्टवर मेट्रो शहरे आणि छोट्या शहरांमधून चिप्स, स्नॅक्स, कोल्ड्रिंक्स, भारतीय जर्सी आणि अन्य वस्तूंना मोठी मागणी आहे,’ असे स्विगीच्या प्रवक्त्याने सांगितले. इन्स्टामार्टवर प्रत्येक ऑर्डरसोबत एक क्यूआर कोड मिळतो. तो ग्राहकाने स्कॅन केल्यास विविध प्रकारच्या सूट मिळतात.
क्रिकेटच्या लोकप्रियतेच्या पार्श्वभूमीवर पीव्हीआर आयनॉक्सही सुमारे ४५ शहरांतील त्यांच्या चित्रपटगृहांत सामने लाइव्ह दाखवणार आहे, असे कार्यकारी संचालक संजीव बिजली यांनी सांगितले. ‘१६ नोव्हेंबरला ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये उपांत्य सामना रंगला असतानाच आम्ही अंतिम सामन्याच्या तिकिटांसाठी आगाऊ बुकिंग खुले केले होते. तसेच, अर्ध्याहून अधिक तिकिटे विकलीही गेली आहेत,’ असे त्यांनी सांगितले. पीव्हीआरने पॉपकॉर्न आणि कोल्ड्रिंकचा अमर्याद पुरवठा करण्याची ऑफर दिली आहे.
हे ही वाचा:
भारतीय क्रिकेट टीमचे ‘भगवे’ टी शर्ट ममता बॅनर्जींना नकोसे
मोहम्मद शमीच्या ट्रोलिंगमागे पाकिस्तानचा कट
जागतिक दक्षिण देशांमध्ये चीनचा प्रभाव कमी; भारताचा दबदबा वाढला
ललित पाटील प्रकरणी पुणे पोलीस दलातील दोन पोलीस कॉन्स्टेबल्सना अटक
बार आणि रेस्टॉरंटमध्येही विक्रमी प्रेक्षक येतील, असा विश्वास असल्याने त्यांनीही मोठे पडदे लावून, बॅनर लावून तसेच, कटआऊट्स लावून प्रेक्षकांना आकर्षित करण्यास सुरवात केली आहे. ‘आमच्या बारमधील कर्मचाऱ्यांनी खास ब्लीड ब्लू शॉट्स नुवला आहे,’ असे विश्वचषक स्पर्धेच्या आयोजकांपैकी एक असणाऱ्या बिर्ला ९१ बीअरचे मालक आणि बीअर कॅफेचे संस्थापक राहुल सिंह यांनी सांगितले. त्यांच्या देशभरातील सर्व आऊटलेट्समध्ये जर्सी घालून य़ेणाऱ्यांना स्पेशल ऑफर दिली जाणार आहे. तर, ‘कायलिन रेस्टॉरंट्समध्ये मोठमोठे स्क्रीन, बीअर बकेट आणि डीजेचीही सोय करण्यात आली आहे. प्रत्येक चौकार आणि षटकाराला तसेच विकेट गेल्यावर नाचण्यासाठी हा डीजे सज्ज असेल,’ असे या रेस्टॉरंट साखळीचे व्यवस्थापकीय संचालक सौरभ खांजिओ यांनी सांगितले.
तर, दिवाळीपासून टीव्ही आणि अन्य वस्तूंच्या किमती कमी झाल्या नसल्याचे टीव्ही कंपन्या आणि किरकोळ विक्रेते सांगत आहेत. अनेक ग्राहक टीव्ही खऱेदी करण्यासाठी दुकानात येत आहेत, असे हे दुकानदार सांगतात.