हॉटेलांत आता रात्री १२ पर्यंत लगबग

हॉटेलांत आता रात्री १२ पर्यंत लगबग

मुंबईतल्या दुकानांना आणि हॉटेलांना रात्री १२ वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात आलेली आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ही माहिती दिलीय. तर मुंबई वगळता इतर शहरातील दुकाने तसेच हॉटेल्संदर्भात स्थानिक प्रशासनाला योग्य तो निर्णय घेण्याचे अधिकार देण्यात आले आहेत. असंही ते म्हणाले. बराच काळ हॉटेल व्यावसाायिक वेळेच्या बाबतीत आग्रही आहेत पण त्यांच्या मागण्यांकडे लक्ष दिले जात नव्हते.

कोरोनाची स्थिती आणि शासनाने लादलेले निर्बंध या सर्व गोष्टींचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बैठक बोलावली होती. या बैठकीत निर्बंध शिथिल करण्याचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयांतर्गतच आता मुंबईतील हॉटेल्स तसेच दुकाने रात्री बारा वाजेपर्यंत सुरु ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. याशिवाय रात्री एक वाजेपर्यंत रेस्टॉरंटना शेवटची ऑर्डर घेता येणार आहे. असा निर्णय देखील घेण्यात आला आहे. या निर्णयाची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.

हे ही वाचा:

बांग्लादेशात हिंदूंवर हल्ले सुरूच, ६० घरं जाळली

शिवसेना-राष्ट्रवादीची ठाण्यात ‘लसी’ खेच

डेरा सच्चा सौदाच्या गुरमित रामराहीमचा जन्म जाणार तुरुंगात

उदय सामंत, गडाख, अब्दुल सत्तार हे काय १९६६ पासूनचे शिवसैनिक आहेत का?

२२ ऑक्टोबरपासून महाराष्ट्रात चित्रपटगृहे, नाट्यगृहेसुद्धा सुरू करणार आहोत. उपाहारगृहे आणि दुकाने यांच्या वेळादेखील वाढवून देण्याची सातत्याने मागणी होत आहे. त्यामुळे त्यांच्या वेळा वाढविण्यासंदर्भात मार्गदर्शक सूचना तयार करण्याचे निर्देश शासनाने दिले आहेत. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत लादण्यात आलेले निर्बंध अजूनही पूर्णपणे शिथिल करण्यात आलेले नाहीत. अनेक तक्रारीनंतर हे निर्बंध हळूहळू मागे घेतले जात आहेत.

Exit mobile version