माथेरानमध्ये ‘रेस्टॉरंट ऑन व्हील’ उपक्रम साईड ट्रॅकला

माथेरानमध्ये पर्यटकांचे स्वप्न भंगले

माथेरानमध्ये ‘रेस्टॉरंट ऑन व्हील’ उपक्रम साईड ट्रॅकला

मध्य रेल्वेच्या नव्या उपक्रमात ‘चाकावरचे उपहारगृह’ म्हणजेच ‘रेस्टॉरंट ऑन व्हील’ हा उपक्रम चालू करण्यात आला. सध्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनर्स व नागपूर येथे मध्य रेल्वेच्या हद्दीत ‘रेस्टॉरंट ऑन व्हील’ सुरु करण्यात आला आहे. यामध्ये मध्य रेल्वेच्या काही स्थानाकांचा समावेश करण्यात आला आहे. तर पर्यटन स्थळ असणाऱ्या माथेरानमध्ये मिनी ट्रेनसाठी अरुंद रूळ (नॅरो गेज) असल्यामुळे, उपहारगृहासाठी मोठ्या आकारांचे डबे नेण्याची सोय नाही त्यामुळे हा प्रकल्प सध्या तरी माथेरानमध्ये होत नसल्याचे मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

मध्य रेल्वेच्या सीएसमटी नंतर आता नागपूरमध्ये ही हा उपक्रम चालू करण्यात आला आहे. या उपक्रमासाठी रेल्वे एक्सप्रेसच्या जुन्या कोचचा वापर करण्यात येणार असून, या कोचचे रूपांतर करून उपहारगृहात करण्यात आले आहेत. चाकावरील उपहारगृह ऑक्टोबर २०२१ मध्ये सीएसएमटी स्थानकात उभारण्यात आले. हा डबा वातानुकूलित असून त्यात ४० आसनांची व्यवस्था करण्यात आली आहे.

हे ही वाचा:

लहान मुले सोबत असलेल्या महिलांना मध्य रेल्वेची ‘भेट

पंतप्रधान मोदींचा जिथे जन्म झाला त्या ठिकाणाला मिळाला सन्मान

कसोटी मालिकेनंतर पाकिस्तानच्या रमीझ राजांनी खुर्ची गमावली

चीनमध्ये कोरोनाचा उद्रेक; येत्या काळात लाखो मृत्यू होण्याची भीती

मात्र माथेरानमध्ये मिनी रेल्वेचे अरुंद रूळ (नॅरो गेज) असल्यामुळे येथे मोठ्या आकारांचे डबे नेण्याची क्षमता नसल्याने, तसेच लहान आकरांच्या डब्यामध्ये अत्यंत कमी आसन व्यवस्था होते.त्यामुके हा उपक्रम माथेरान मध्ये होऊ शकत नसल्याचा निर्णय मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. तसेच हा उपक्रम मध्य रेल्वेच्या दादर, लोकमान्य टिळक टर्मिनर्स, कल्याण, लोणावळा, नेरळ, इगतपुरी स्थानकांच्या हद्दीत जागेची पाहणी करण्यात आली आहे. लवकरच येथे हा प्रकल्प चालू करण्यात येणार आहे. या ‘चाकावरचा उपहारगृह’ म्हणजेच

Exit mobile version