25 C
Mumbai
Sunday, November 24, 2024
घरविशेषअमेरिकेतील भारतीय राजदूताला खलिस्तानी समर्थकांची धक्काबुक्की!

अमेरिकेतील भारतीय राजदूताला खलिस्तानी समर्थकांची धक्काबुक्की!

हरदीपसिंग निज्जरच्या हत्येमध्ये सहभाग असल्याचा समर्थकांनी केला आरोप

Google News Follow

Related

अमेरिकेतील न्यू यॉर्कच्या गुरुद्वारामध्ये खलिस्तानी समर्थकांनी भारतीय दूताला धक्काबुक्की केल्याची घटना घडली आहे.अमेरिकेतील भारताचे राजदूत तरनजीत सिंग संधू याना खलिस्तानी समर्थकांनी धक्काबुक्की केली आणि हरदीपसिंग निज्जरच्या हत्येमध्ये सहभाग असल्याचा आरोप देखील समर्थकांनी केला.

अमेरिकेतील भारताचे राजदूत तरनजीत सिंग हे न्यूयॉर्कमधील गुरुद्वाराला भेट देत असताना ही घटना घडली.या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.या व्हिडिओमध्ये तरनजीत सिंग संधू यांच्यावर धक्काबुक्की करत खलिस्तानी समर्थक आरोप करताना दिसत आहेत.

भाजपचे प्रवक्ते आरपी सिंह यांनी शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये दिसत आहे की, खलिस्तानी दहशतवादी हरदीप सिंग निज्जरची हत्या आणि गुरपतवंत सिंग पन्नून याच्याशी संबंधित आरोपावर अनेक खलिस्तानी समर्थक राजदूत तरनजीत सिंग संधू यांच्याशी वाद घालताना दिसत आहेत.“निज्जरच्या हत्येला तुम्ही जबाबदार आहात. तुम्ही पन्नूनला ठार मारण्याचा कट रचला होता,” असा आरोप जमावाकडून करण्यात आला.रविवारी (यूएस स्थानिक वेळेनुसार) लाँग आयलंडमधील हिक्सविले गुरुद्वारामध्ये तरनजीत सिंग संधू गुरुपूरबच्या प्रार्थनेला उपस्थित असताना ही घटना घडली.या संघर्षानंतर,भारतीय राजदूत गुरुद्वारातून निघताना दिसले, तर एका निदर्शकाने परिसराबाहेर खलिस्तानी ध्वज फडकावला.

हे ही वाचा:

अवकाळी पावसामुळे वीज कोसळून २० जणांचा मृत्यू!

अवकाळी पावसाच्या हजेरीने मुंबईतील हवेची गुणवत्ता सुधारली

उत्तरकाशीतील बोगद्यात अडकलेल्या मजुरांच्या मदतीला कोल इंडिया

खलिस्तानी दहशतवादी अर्शदीपच्या दोन शूटर्सला ठोकल्या बेड्या

व्हिडिओवर प्रतिक्रिया देताना भाजप नेते मनजिंदर सिंग सिरसा यांनी या कृतीचा निषेध केला आणि त्यांना “गुंड” म्हणून संबोधले.मनजिंदर सिंग सिरसा म्हणाले की, तरनजीत सिंग संधू हे न्यूयॉर्कमधील गुरुद्वारामध्ये गुरुपूरानिमित्त दर्शनासाठी गेले होते.त्यांना तेथे खलिस्तानी गुंडांनी मारहाण केली आणि धमक्या दिल्या. हा शिखांचा संदेश आहे का?, हा गुरु नानकांचा संदेश आहे का? हे गुंड शीख नाहीत. !”असे सिरसा यांनी एएनआय या वृत्तसंस्थेला सांगितले.

दरम्यान, परराष्ट्र मंत्रालयाने (MEA) आपल्या मुत्सद्दींच्या सुरक्षेबद्दल गंभीर चिंता व्यक्त केली होती.तसेच भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी उपाययोजना करण्याचे आवाहन करून हा विषय अमेरिकेकडे मांडल्याचे परराष्ट्र मंत्रालयाकडून सांगण्यात आले.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
195,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा