28 C
Mumbai
Saturday, December 28, 2024
घरविशेषअतुल्य भारताचा सन्मान करा, 'या' ऑस्ट्रेलियन खेळाडूने मीडियाला सुनावले

अतुल्य भारताचा सन्मान करा, ‘या’ ऑस्ट्रेलियन खेळाडूने मीडियाला सुनावले

Google News Follow

Related

भारत सध्या कोरोना व्हायरसच्या दुसर्‍या लाटेचा सामना करीत आहे. दररोज लाखो लोकांना या विषाणूची लागण होत आहे, तर हजारो लोक मृत्यूमुखी पडत आहेत. जगभरातली माध्यमं भारताच्या कोरोना परिस्थितीचं अतिशय तिखट वार्तांकन करत आहेत. याच माध्यमांना ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटर मॅथ्यू हेडनने कठोर शब्दात सुनावलं आहे. ‘अतुल्य भारताचा सन्मान करा’, असा सल्ला त्याने जगभरातील माध्यमांना दिला आहे. तसंच तुम्ही भारताची जी निंदा करताय त्याने मला रडू येत येतंय, असं तो म्हणाला.

भारताच्या कठीण काळात, जगभरातून मदतीसाठीचे हात पुढे येत आहेत. भारताशिवाय इतर देशांच्या खेळाडूंनीही मदतीसाठी अनेक पावलं पुढे टाकलीत. खास करुन ऑस्ट्रेलियाचे खेळाडू मदतीसाठी पुढे सरसावले आहेत. यात मॅथ्यू हेडनचं नाव जोडलं गेलंय. भारत सध्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेशी झुंजतोय. लाखोंना कोरोनाची लागण होतीय तर शेकडो जीव गमावतायेत. अशा परिस्थितीत हेडनने ऑस्ट्रेलियातील नागरिकांना भारताला मदतीचं आवाहन केलंय.

भारत कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करतोय, झुंजतोय. भारतात याअगोदर अशी परिस्थिती नव्हती. या कठीण काळात जगभरातील माध्यमं १४० करोड लोकांच्या देशाची निंदा करतायेत, वाट्टेल तसे बोलायला मागेपुढे पाहत नाहीयत. पण मला त्यांना सांगायचंय, की इतकी मोठी लोकसंख्या असलेल्या देशात एखादी योजना पोहोचवायची हे खूप मोठं आव्हान आहे. आता तर महामारीचा काळ आहे, अशा शब्दात हेडनने माध्यमांना खडसावलं.

पुढे बोलताना हेडन म्हणाला, “पाठीमागच्या एका दशकापासून मी भारतात जातोय. भारतातल्या अनेक भागांत फिरलोय, खासकरुन तामिळनाडू, ज्या राज्याला मी माझं आध्यात्मिक घर मानतो. इतका विविधतेने नटलेला आणि विशाल देशाचं नेतृत्व करणाऱ्या नेत्यांबद्दल माझ्या मनात नेहमीच सर्वोच्च सन्मान राहिलाय.”

हे ही वाचा:

अमित शहा- उद्धव ठाकरे तातडीची बैठक, तौक्ते वादळांवर चर्चा

मोदींविरोधी पोस्टर्ससाठी ‘आप’ने हाताशी धरले रिक्षावाल्यांना

मविआ नेत्यांविरोधात मराठा संघटनेचे जोडे मारो आंदोलन

…आणि केंद्राच्या मदतीमुळे तळोज्यातील ऑक्सिजन प्लँटला मिळाला स्पेअरपार्ट!

“भारतात मी जिथंही गेलो तिथे लोकांनी मला खूप प्रेम दिलं, त्यासाठी मी नेहमीच त्यांचा ऋणी राहील. मी मोठ्या अभिमानाने सांगू शकतो की गेल्या काही वर्षात मी भारत अगदी जवळून पाहिला आहे. यावेळी देश केवळ संकटात आहे म्हणून नाही तर माध्यमं सध्या भारताविषयी जे चित्र सांगतायत त्याने मला रडू येतंय. माध्यमांपैकी थोड्याच जणांनी या देशाच्या समस्या समजून घेतल्या असाव्यात किंवा त्यांना माहिती असाव्यात”, अशा कठोर शब्दात हेडनने माध्यमांना सुनावलं.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
217,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा