बांग्लादेशच्या पंतप्रधान शेख हसिना यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. आरक्षणाच्या मुद्यावरून बांग्लादेशमधील परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेल्याने शेख हसीना यांनी आपल्या पंतप्रधान पदाचा राजीनामा दिला आहे. राजीनामा दिल्यानंतर त्यांनी ढाका सोडले आहे. हसीना शेख यांच्या राजीनाम्यानंतर लष्कर बांग्लादेशचा ताबा घेणार आहे. लष्कर लवकरच पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडणार आहेत. दरम्यान, हसीना शेख यांनी बांगलादेश सोडून भारतात आल्याची माहिती समोर येत आहे.
विद्यार्थी आंदोलक, सत्ताधारी कार्यकर्ते आणि पोलिसांच्या झालेल्या झटापटीत आतापर्यंत ३०० हुन अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. शेख हसीना यांच्या राजीनाम्याची मागणी करत आंदोलक निदर्शने करत आहेत. काल (४ ऑगस्ट) झालेल्या हिंसाचारात एकूण १०० हुन अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. तर मागील महिन्यात झालेल्या हिंसाचारात २०० असे एकूण ३०० जणांचा मृत्यू झाला. आंदोलकांनी पंतप्रधान निवास स्थान, कार्यालयाची तोडफोड केली. आंदोलकांनी हसीना शेख यांच्या निवासस्थानाची तोडफोड करत सामानाची लूट केली. तसेच हसीना शेख यांच्या वडिलांच्या पुतळ्याची देखील तोडफोड केली. परिस्थिती हाताबाहेर जाताच हसीना शेख यांनी आपल्या पंतप्रधान पदाचा राजीनामा देत बांगलादेश सोडले.
हे ही वाचा..
सेन्सेक्स २,५०० अंकांनी घसरला, निफ्टीतही घसरण
उत्तर प्रदेश बलात्कार प्रकरणात सामील असलेला राजू हा हिंदू नव्हे तर मुस्लिम…पोलिसांकडून स्पष्टीकरण
भारतीय हॉकी संघाला मोठा धक्का, स्टार खेळाडू अमित रोहिदासवर एका सामन्याची बंदी !
मुस्लीम धर्म स्वीकारण्यास नकार दिल्याने दिली ॲसिड हल्ल्याची धमकी
सुरुवातील हसीना शेख अज्ञात निवास स्थानी असल्याची माहिती समोर आली होती. तर सध्या त्या भारतात दाखल होत असल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान, लष्कर आता बांग्लादेशचा ताबा घेणार असून पत्रकार परिषद घेऊन लवकरच आपली भूमिका मांडणार आहेत.