बोरिवली येथील दुभाजकाच्या कामाचा सतावतोय वाहनचालकांना धोका

बोरिवली येथील दुभाजकाच्या कामाचा सतावतोय वाहनचालकांना धोका

मुंबईतील महापालिकेचे नागरी कामांच्या बाबतीतील ढिसाळ नियोजन उघड आहे. याची प्रचिती बोरिवली पश्चिमेतील नागरिकांना वारंवार येत आहे. याठिकाणी रस्त्याच्या दुभाजकाचे काम चालू केले आहे. त्यासाठी नव्या प्रकारचे दुभाजक देखील रस्त्याच्या मधोमध रचून ठेवले आहेत. त्यामुळे रहदारीला अडथळा देखील निर्माण होत आहे.

बोरिवली पश्चिम येथील लोकमान्य टिळक मार्गावर दुभाजकाचे काम चालू आहे. त्यासाठी नव्या रचनेचे दुभाजक कामाच्या ठिकाणी आणले आहेत. मात्र ते अतिशय धोकादायक पद्धतीने रचून ठेवण्यात आले आहेत. दुभाजकाचे नवे ब्लॉक एकमेकांच्या आधाराने रचून ठेवले आहेत. अशा प्रकारे त्यांना ठेवण्याबाबत येथील स्थानिक रहिवाशांनी चिंता देखील व्यक्त केली आहे. या ब्लॉकपैकी एक ब्लॉक पडला, तरी तो इतरांना घेऊन पडू शकतो, आणि त्यामुळे अतिशय रहदारीच्या रस्त्यावर मोठा अपघात होऊ शकतो अशा प्रकारची चिंता व्यक्त केली जात आहे. याबाबतचा छोटा व्हिडिओ देखील समोर आला आहे.

हे ही वाचा:

निर्बंध झुगारत नवी मुंबईत दुकानं उशिरा पर्यंत सुरूच

शरद पवार हे साडेतीन जिल्ह्याचे स्वामी

शिवसेनेला ‘व्हीप’ची गरज का पडली?

ठाकरे सरकारमध्ये पब,डिस्को,बारना सवलतींचा प्रसाद आणि गणपती उत्सव बंदिवासात

मुंबई महानगरपालिकेने आजवर नालेसफाई, उड्डाणपुलाचे बांधकाम यांसारख्या विविध नागरी कामांच्या बाबत अतिशय बेजबाबदार असल्याचे वारंवार उघड झाले आहे. यंदाच्या पावसाळ्यात देखील, पहिल्याच पावसाने मुंबई महानगरपालिकेचे नालेसफाईचे दावे साफ धुवून नेले होते. बोरिवली पश्चिम येथीलच कोरा केंद्र येथील उड्डाणपुलाच्या बांधकामावरील खर्चात झालेल्या वाढीवरून देखील महानगरपालिकेवर सडकून टीका झाली होती.

Exit mobile version