30 C
Mumbai
Friday, September 20, 2024
घरविशेषसिक्किमच्या संभाव्य आपत्तीबाबत दशकभरापूर्वीपासून इशारे!

सिक्किमच्या संभाव्य आपत्तीबाबत दशकभरापूर्वीपासून इशारे!

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

Google News Follow

Related

सिक्किममध्ये ढगफुटीमुळे झालेल्या दुर्घटनेत आतापर्यंत १४ जण मृत्युमुखी पडले असून १०२ जण अद्यापही बेपत्ता आहेत. मात्र ही आपत्ती इशाऱ्याशिवाय ओढवलेली नाही. गेल्या दशकभरात अनेक सरकारी संस्था आणि संशोधकांनी सिक्किममधील हिमनदी ल्होनकला पूर येण्याचा धोका असल्याचा इशारा वारंवार दिला होता. मात्र याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचे आढळून आले आहे.ल्होनक सरोवराबाबत सन २०२१मध्येच इशारा देण्यात आला होता. मात्र सर्व इशाऱ्यांकडे दुर्लक्ष करण्यात आले. बुधवारी ढगफुटीमुळे तीस्ता नदीला पूर आला आणि जनजीवन विस्कळीत झाले. परिणामी, सुमारे २२ हजार ३४ जण विस्थापित झाले आहेत.

दक्षिण ल्होनक सरोवर सिक्कीमच्या वायव्य भागात आहे. हे सरोवर सर्वांत धोकादायक १४ सरोवरांपैकी एक आहे. हे सरोवर समुद्रसपाटीपासून १७ हजार १०० फुटांवर आहे. ल्होनक हिमनदीचा बर्फ वितळून हे सरोवर तयार झाले आहे. हिमनद्या वेगाने वितळत असल्याने या सरोवराचा आकार झपाट्याने वाढत आहे. नॅशनल रिमोट सेन्सिंग सेंटर आणि इस्रोने संयुक्तपणे सन २०१२-१३मध्ये केलेल्या अभ्यासात या सरोवराच्या धोक्याबाबत इशारा दिला होता. तसेच, येथे पूरपरिस्थितीबाबत लवकर इशारा देणारी यंत्रणा आणि हवामान परिस्थितीची माहिती देण्यासाठी स्वयंचलित यंत्रणा बसवण्यासाठी नुकतीच पाहणीही करण्यात आली होती. सिक्किम मनुष्यविकास अहवाल २००१मध्येही सिक्किममध्ये पूरपरिस्थिती उद्भवण्याचा इशारा दिला होता.

हे ही वाचा:

‘न्यूजक्लिक’ने अमेरिकी उद्योगपतीकडून स्वीकारले २८.२९ कोटी रुपये!

‘हायवे मॅन ॲाफ इंडिया’च्या आयुष्याची कहाणी उलगडणार मोठ्या पडद्यावर

गतविजेत्या इंग्लंडची अपयशी सलामी

संजय सिंह यांची अटक वॉरंटशिवाय अथवा कारणाशिवाय नाही

४ ऑक्टोबर रोजी आलेल्या हिमनदी सरोवराचा उद्रेक ‘ग्लेशियर लेक आउटबर्स्ट फ्लड’मुळे (जीएलओएफ) झाला. पुरामुळे सरोवरातील पाण्याच्या पातळीत झपाट्याने वाढ झाली. ज्यामुळे मंगन, गंगटोक, पाक्योंग आणि नामची जिल्ह्यांमध्ये प्रचंड नुकसान झाले. ‘ग्लेशियर लेक आउटबर्स्ट फ्लड’मध्ये हिमनदीतील बर्फ वितळून हिमनद्यांनी तयार झालेले सरोवरांना पूर येतो. सरोवरात जास्त पाणी साचल्यामुळे किंवा भूकंपासारख्या धक्क्यामुळे हिमनद्यांखालून वाहणारे पाणी मोठ्या वेगाने बाहेर पडते आणि पूरपरिस्थिती उद्भवते. अशी पूरपरिस्थिती टाळण्यासाठी हिमनद्यांच्या सरोवरातून पाणी काढून टाकण्यासाठी उच्च घनतेचे पॉलीथिलीन पाईप्स बसवण्यात आले.

एल्सव्हिअर जर्नलमध्ये २०२१मध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासात दक्षिण ल्होनाक सरोवराला उच्च उद्रेकाच्या संभाव्यतेसह संभाव्य धोकादायक म्हणून जाहीर केले गेले. सन १९६२ पासून ते २००८पर्यंत म्हणजे या ४६ वर्षांत हिमनदीचे क्षेत्र अंदाजे दोन किमीने कमी झाले. तर, सन २००८ ते २०१९पर्यंत यात आणखी ४०० मीटरने घट झाली. त्यामुळे या सरोवराच्या धोक्याच्या संभाव्यतेबद्दल चिंता निर्माण झाली आहे. या खोऱ्यात मोठ्या प्रमाणावर लोकवस्ती आणि पायाभूत सुविधा आहे, असे अभ्यासात ठळकपणे नमूद केले आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
178,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा