28 C
Mumbai
Wednesday, November 27, 2024
घरविशेषरिझर्व्ह बँकेने पटकावला आरसीएफ टी- २० चषक

रिझर्व्ह बँकेने पटकावला आरसीएफ टी- २० चषक

रेप्रो इंडिया एससीवर ३ विकेट राखून विजय

Google News Follow

Related

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने अंतिम फेरीत रेप्रो इंडिया एससीवर ३ विकेट राखून विजय मिळवत आरसीएफ-डॉ. बाबासाहेब आंबेडकर टी-ट्वेन्टी चषक आंतर- कार्यालय स्पर्धेचे जेतेपद पटकावले.

राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स (आरसीएफ) आयोजित मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या मान्यतेने (एमसीए) चेंबूर येथील आरसीएफ कॉलनी मैदानावर झालेल्या स्पर्धेच्या अंतिम फेरीत शुक्रवारी आरबीआयचा गोलंदाज विजय कुमावत (४-१९) आणि फॉर्मात असलेला फलंदाज ज्योत छायाचे (३८ चेंडूंत ७० धावा) सातत्य त्यांच्या विजयाचे प्रमुख वैशिष्ट्य ठरले.

रेप्रो इंडियाने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. मात्र, त्यांना १९.५ षटकांत ११९ धावाच करता आल्या.सलामीवीर सुमेर झवेरीचे सर्वाधिक योगदान राहिले. त्याने २२ चेंडूंत तीन चौकार आणि दोन षटकारांसह ३२ धावा केल्या. तळातील मोहम्मद मोईन अहमदने २० चेंडूंत ४ चौकारांसह २६ धावा करताना संघाला शतकी मजल मारून दिली. आरबीआयकडून विजय कुमावतने १९ धावांत ४, अष्टपैलू अमेय दांडेकरने २५ धावांत ३ आणि चिराग पामरने २३ धावांत ३ विकेट घेत प्रतिस्पर्ध्यांना कमीत कमी धावांमध्ये रोखण्यात मोलाचा वाटा उचलला.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने १२० धावांचे विजयी लक्ष्य १५.२ षटकांत ७ विकेटच्या बदल्यात पार केले. माफक आव्हान असूनही त्यांचीही सुरुवात अडखळत झाली. शिवाय, अन्य प्रमुख फलंदाजांनी निराशा केली. ४ बाद ४९ धावा अशा खराब स्थितीत फॉर्मात असलेल्या ज्योत छायाने ३८ चेंडूंत २ चौकार आणि ७ उत्तुंग षटकारांसह ७० धावांची एकहाती सर्वोत्तम खेळी करतानाच अमेय दांडेकरसह (२५ धावा) पाचव्या विकेटसाठी ७४ धावांची भागीदारी करताना विजयात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. रमनप्रीत सिंगने १९ धावा करताना त्यांना चांगली साथ दिली. मोहम्मद मोईन अहमद आणि शुभम मराठेने प्रत्येकी ३ विकेट घेत सामन्यात रंगत आणली. मात्र, तुलनेत कमी धावा आणि ज्योत छायाचे सातत्य पाहता त्यांची अचूक गोलंदाजी व्यर्थ ठरली. ज्योत यालाच अंतिम सामन्यातील सामनावीर म्हणून गौरविण्यात आले.

वैयक्तिक पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट फलंदाज म्हणून योगेश डोंगरे (३ सामन्यांत १४६ धावा-रेप्रो इंडिया), सर्वोत्कृष्ट गोलंदाज म्हणून अमेय दांडेकर (४ सामन्यांत १६ षटकांत ११ विकेट-आरबीआय), सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून रूपेन चौरसिया (३ झेल, १ स्टंपिंग, १ धावबाद – रेप्रो इंडिया) तसेच मालिकावीर म्हणून अमेय दांडेकरला (८५ धावा, ११ विकेट्स-आरबीआय) सन्मानीत करण्यात आले.

प्रमुख पाहुणे, राष्ट्रीय निवडसमितीचे माजी अध्यक्ष आणि माजी कर्णधार दिलीप वेंगसरकर यांच्या हस्ते विजेत्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया संघाला झळाळता डॉ. बाबासाहेब आंबेडकर चषक आणि एक लाख रुपयांचा धनादेश प्रदान करण्यात आला. रेप्रो इंडिया संघाला उपविजेतेपदासाठीची ट्रॉफी आणि ७५ हजार रुपये देण्यात आले.

हे ही वाचा:

“निर्णय सर्वोच्च न्यायालयाचा असला तरी नरेंद्र मोदी नसते तर राम मंदिर पूर्ण झाले नसते”

मांस-मटन खाण्याच्या मुद्द्यावरून संजय राऊतांकडून ‘इंडी’ आघाडीच्या नेत्यांची पाठराखण

बंगळूरू कॅफे ब्लास्टच्या मास्टरमाइंडचे वडील होते सैन्यदलात; मुलाच्या कृत्याने दुःखी

लेबनानचा उत्तर इस्रायलवर रॉकेट हल्ला

संक्षिप्त धावफलक: रेप्रो इंडिया एससी -१९.५ षटकांत सर्वबाद ११८ सर्वबाद(सुमेर झवेरी ३२ (२२ चेंडू, ३ चौकार, २षटकार), मोहम्मद मोईन अहमद २६, विजय कुमावत ४/१९, अमेय दांडेकर ३/२५, चिराग परमार ) वि. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया- १५.२ षटकांत ७ बाद १२० (ज्योत छाया ७० (३८ चेंडू, २ चौकार, ७ षटकार), अमेय दांडेकर २५ (२६ चेंडू, २ चौकार); मोहम्मद मोईन अहमद ३/२४, शुभम मराठे ३/२९). निकाल: रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ३ विकेट राखून विजयी.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
199,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा