27 C
Mumbai
Sunday, November 24, 2024
घरविशेषइर्शाळवाडीमध्ये बचावकार्याला सुरुवात; ५० ते ६० जण अजूनही ढिगाऱ्याखाली

इर्शाळवाडीमध्ये बचावकार्याला सुरुवात; ५० ते ६० जण अजूनही ढिगाऱ्याखाली

१६ जणांचा दुर्घटनेत मृत्यू

Google News Follow

Related

रायगड जिल्ह्यातील इर्शाळगडावरील इर्शाळवाडीवर बुधवारी रात्रीच्या सुमारास दरड कोसळली. ही घटना घडल्यानंतर मध्यरात्री तिथे बचावकार्य सुरू झालं. संपूर्ण गाव मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडले गेले. गुरुवारी दिवसभर बचावकार्य सुरू होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि इतर मंत्रीही घटनास्थळी उपस्थित होते. दिवसभर बचावकार्य केल्यानंतरही अद्याप घटनास्थळी मोठ्या प्रमाणावर मातीचा ढिगारा साचला आहे. तर, ५० ते ६० जण अजूनही ढिगाऱ्याखाली अडकले असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्याामुळे आज दुसऱ्या दिवशीही एनडीआरएफने सकाळीच बचावकार्याला सुरुवात केली आहे.

अद्याप घटनास्थळी २० फुटांचा दगड- मातीचा ढिगारा असून तो उपसण्याचे काम निव्वळ कुदळ आणि फावड्याच्या साहाय्याने सुरू आहे. डोंगरावर चालत जाणं कठीण असताना जेसीबी, पोकलेन इत्यादी यंत्रे नेणं आणखी कठीण आहे. त्यात निसरडी माती, वारा, पाऊस आणि धुक्यामुळे मदतकार्यात मोठा अडथळा येत आहे. हे बचावकार्य अजून किती वेळ चालेल हे सांगणे कठीण असून पावसामुळे काम थांबले जात आहे. सध्या एनडीआरएफची चार पथकं बचावकार्य करत आहेत. आतापर्यंत १६ जणांचा या दुर्घटनेत मृत्यू झाला आहे. तर, जखमींवर उपचार सुरू आहेत.

हे ही वाचा:

शांतता राखा… मणिपूरमधील वेदनादायी घटनांनंतर आवाहन

विनेश, बजरंगच्या निवडीविरोधात खेळाडू, पालकांचे आंदोलन

जैन साधूंच्या निघृण हत्याकांडा विरोधात विशाल मौन रॅलीचे आयोजन !

भारत वेस्ट इंडिज शतकी कसोटी, कोहली ५००

रायगड जिल्ह्यातल्या इर्शाळगडाच्या पायथ्यापासून काही उंचीवर इर्शाळवाडी आहे. साधारणपणे ४८ कुटुंबांची ही वाडी असून त्यातील २५ ते ३० घरांवर बुधवारी रात्री दरड कोसळली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी गुरुवारी विधानसभेतील निवेदनात या दुर्घटनेची माहिती दिली. पायथ्यापासून काही उंचीवर ही वाडी असून या वाडीपर्यंत जाण्यासाठी पक्का रस्ता उपलब्ध नाही. त्यामुळे एनडीआरएफ आणि प्रशासनाला जेसीबी किंवा पोकलेन घटनास्थळापर्यंत नेणं अशक्य झालं आहे. खराब हवामानामुळे हवाई मार्गाने मदत पोहचवणेही अशक्य आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
195,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा