27 C
Mumbai
Monday, December 23, 2024
घरविशेषडोंगरावरून ४०० फूट खाली कोसळलेल्या तरुणीची सुटका

डोंगरावरून ४०० फूट खाली कोसळलेल्या तरुणीची सुटका

Google News Follow

Related

कर्जत तालुक्यातील माथेरानच्या पायथ्याशी असलेल्या, पेब किल्ल्यावरून ४०० फूट खाली पडलेल्या २७ वर्षीय ऐश्वर्या धालगडे हिची शनिवारी सुखरूप सुटका करण्यात आली. सात तासांच्या बचावमोहिमेनंतर या तरुणीची सुटका करण्यात यश आले.

पेब किल्ल्याचा ट्रेक यशस्वीरीत्या पूर्ण करून पाच जणांचा एक गट परत येत होता. त्या वेळी २७ वर्षीय आयटी तरुणी किल्ल्याच्या भागातून घसरली. टेकडीच्या खाली असलेल्या एका झाडावर ती लटकली आणि बचावली मात्र तिच्या मांडीला, कंबरेला दुखापत झाली आहे.

धालगडे ही ओशिवरा, अंधेरी येथील रहिवासी आहे. तिचे दोन मित्र – अनिकेत मोहिते आणि अंकिता मराठे हे देखील अंधेरीचे रहिवासी आहेत. तर, रुपेश वीर आणि तन्वी पार्टे ठाण्यात राहतात. या पाच जणांनी शनिवारी सकाळी ११ च्या सुमारास पेब किल्ल्याकडे जाताना गणपती मंदिरात दर्शन घेतले होते. या मार्गावर सुमारे एक किमीचा ट्रेक पूर्ण केल्यानंतर ती महिला घसरली आणि दुपारी एकच्या सुमारास खाली पडली. एका ट्रेकरने तत्काळ पोलिस नियंत्रण कक्षाला फोन करून कळवले आणि माथेरान पोलिसांना सतर्क करण्यात आले.

नेरळच्या आंबेवाडी आदिवासींनीही मदतीसाठी धाव घेतली, पण त्यांना यश मिळाले नाही. सह्याद्री बचाव पथक, वन कर्मचारी, डॉ. सचिन वाणी आदींसह पोलिस घटनास्थळी पोहोचले. जवळच्या रस्त्याच्या ठिकाणी रुग्णवाहिका सज्ज ठेण्यात आली होती.

ऐश्वर्या ज्या भागातून पडली आणि ज्या भागातून ते सर्वजण उतरत होते, त्या ट्रेक मार्गाच्या ठिकाणी विविध उतार आहेत. दुपारी दीड ते रात्री आठच्या दरम्यान ही बचावमोहीम सुरू होती.

हे ही वाचा:

‘गेले ३० तास माझ्या भागात वीज नाही’

नवी मुंबईतून ४८ तासांत सहा मुले बेपत्ता

लष्कर-ए-तैयबाचा प्रमुख अदनान अहमदची कराचीमध्ये हत्या!

नवं सिम घेण्यासाठी डिजिटल केवायसी अनिर्वाय

आदिवासी आणि बचावकर्त्यांना आव्हान उभे ठाकले होते. बचावकर्ते तिला वाचवण्यासाठी हातात दोरी आणि स्ट्रेचर घेऊन खाली उतरले. प्राथमिक तपासणीनंतर तिची सुटका करून तिला प्रथम स्ट्रेचरवर ठेवण्यात आले. त्यानंतर, बचावकर्ते, पोलिस आणि आदिवासींनी तिला स्ट्रेचरवर ठेवून तब्बल चार तास ट्रेकिंगच्या मार्गावर चालत नेऊन रस्त्यावर थांबलेल्या रुग्णवाहिकेपर्यंत नेले. तिच्यावर बदलापूर येथील पाटकर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेची नोंद नवी मुंबई पोलिस आयुक्तालयाच्या पनवेल तालुका पोलिस ठाण्यांतर्गत करण्यात आली आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा