भारत-चीन सीमाभागात बर्फात अडकलेल्या ५०० जणांची सुटका

लष्कराच्या त्रिशक्ती कॉर्प्सच्या जवानांची धाडसी कामगिरी

भारत-चीन सीमाभागात बर्फात अडकलेल्या ५०० जणांची सुटका

नैसर्गिक आपत्ती असो वा आपत्कालीन परिस्थिती यात अडकलेल्या नागरिकांच्या सुटकेसाठी सदैव भारतीय लष्कर तत्पर असते. अशाच एका मोहिमेत भारतीय लष्कराच्या जवानांनी बर्फात अडकलेल्या ५०० लोकांना सुखरूप बाहेर काढलं आहे. सिक्कीममध्ये अडकलेल्या लोकांना सुखरूप बाहेर काढण्याचे काम भारतीय जवानांनी केले आहे. लष्कराच्या त्रिशक्ती कॉर्प्सच्या जवानांनी ही धाडसी कामगिरी केली आहे.

सिक्कीममधील भारत- चीन सीमेवरील नाथुला येथे झालेल्या मुसळधार बर्फवृष्टीमुळे अनेक पर्यटक येथे अडकून पडले होते. जवळपास ५०० लोक अडकून पडल्याची माहिती होती. नथुला येथे अडकलेल्या ५०० हून अधिक पर्यटकांची बुधवारी सुटका करण्यात आली. लष्कराने अधिकृत निवेदनात ही माहिती दिली आहे. माहितीनुसार, पूर्व सिक्कीममध्ये अचानक झालेल्या बर्फवृष्टीमुळे अडकलेल्या ५०० हून अधिक पर्यटकांची लष्कराच्या त्रिशक्ती कॉर्प्सच्या जवानांनी सुटका केली.

त्रिशक्ती कॉर्प्सच्या जवानांना नथुला येथे बचावकार्यासाठी म्हणून पाठवण्यात आले होते. त्यांनी अडकलेल्या पर्यटकांना मदत केली. पर्यटकांना गरम अन्न आणि त्वरित वैद्यकीय मदत देण्यात आली. त्याशिवाय त्यांना सुरक्षित वाहतूक प्रदान करण्यात आली. त्रिशक्ती कॉर्प्सने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर संबंधित काही छायाचित्रे देखील शेअर केली आहेत.

हे ही वाचा:

शेतकऱ्यांचे आंदोलन राजकीय हेतूने प्रेरित; किमान आधारभूत किमतीची मागणी चुकीची

लुडो गेम खेळण्यातून सहकाऱ्याची हत्या करून आरोपीची आत्महत्या!

बिहारमध्ये १५ जणांना नेणाऱ्या रिक्षाला अपघात; ९ ठार!

भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात ४ वर्षांच्या मुलीचा मृत्यू

या पोस्टमध्ये लिहिले आहे की, “अचानक सुरू झालेल्या मुसळधार बर्फवृष्टीमुळे नाथुलामध्ये ५०० हून अधिक पर्यटकांना घेऊन जाणारी सुमारे १७५ वाहने अडकली होती. यावेळी ‘त्रिशक्ती कॉर्प्स’चे जवान शून्य तापमानात घटनास्थळी पोहोचले आणि अडकलेल्या पर्यटकांची सुटका केली. तत्काळ औषध, गरम अन्न आणि सुरक्षित वाहतुकीची व्यवस्था करण्यात आली.” हिमालयातील सीमेचे रक्षण करणारी त्रिशक्ती कॉर्प्स पर्यटकांना आणि सर्वसामान्यांना मदत करण्यासाठी सदैव तत्पर असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

Exit mobile version