गुजरातमधील पोरबंदरच्या किनाऱ्याजवळ अरबी समुद्रामध्ये भारतीय तटरक्षक दलाच्या हेलीकॉप्टरला आपत्कालीन लँडिंग करावं लागल्याची माहिती समोर आली आहे. या हेलीकॉप्टरमधील एका सदस्याला वाचवण्यात यश आले असून अद्याप तीन सदस्य बेपत्ता आहेत. पोरबंदरच्या किनारपट्टीलगत बचाव मोहिमेदरम्यान या हेलिकॉप्टरला आपत्कालीन लँडिंग करावे लागले. एका जखमी नाविकाला वाचवण्यासाठी कोस्टगार्डचं हेलीकॉप्टर रात्री रवाना झाले होते यावेळी ही घटना घडली.
तटरक्षक दलाने दिलेल्या माहितीनुसार, पोरबंदरपासून सुमारे ४५ किमी अंतरावर असलेल्या ‘हरी लीला’ या मोटार टँकरवर एक जण जखमी असल्याची माहिती मिळाली होती. या नाविकाच्या मदतीसाठी रात्री ११ वाजता ऍडवान्स लाईट हेलीकॉप्टरने उड्डाण केले. यात चालकासह चार सदस्य होते. मात्र, या हेलिकॉप्टरचं समुद्रामध्ये आपत्कालीन लँडिंग करावं लागलं. यादरम्यान हे हेलिकॉप्टर समुद्रात कोसळलं. दरम्यान, दुर्घटनाग्रस्त हेलिकॉप्टरच्या चालक दलामधील एका चालकाला वाचवण्यात यश आलं आहे. तर, उर्वरित तिघांचा शोध सुरू आहे. दरम्यान, दुर्गटनाग्रस्त हेलिकॉप्टरचे अवशेषही सापडले असून सध्या मदत आणि बचाव कार्यामध्ये चार जहाजे आणि दोन विमानांना तैनात करण्यात आलं आहे.
On 02 Sep 2024, @IndiaCoastGuard ALH helicopter was launched at 2300 hrs to evacuate an injured crew member from the Motor Tanker Hari Leela off #Porbandar, #Gujarat. The helicopter had to make an emergency hard landing and ditched into sea. One crew member recovered, search for…
— Indian Coast Guard (@IndiaCoastGuard) September 3, 2024
हे ही वाचा..
हिंदू विद्यार्थ्यांच्या कपाळावरील तिलक काढण्याचे प्रकरण : दोन शिक्षिका निलंबित
आपचे आमदार अमानतुल्ला खानला चार दिवसांच्या ईडी कोठडीत!
गणेशोत्सवाच्या तोंडावर एस टी कर्मचाऱ्यांकडून संपाची हाक
राजस्थानमध्ये मिग २९ विमान कोसळलं; पायलट सुखरूप
एकीकडे गुजरातमधील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाने हाहाःकार माजवला आहे. अनेकांना इतर सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले असून गुजरातमधील मदत आणि बचाव कार्यामध्ये तटरक्षक दलही गुंतले आहे. तटरक्षक दलासोबतच एनडीआरएफ आणि एसडीआरएफ, भारतीय लष्कर, भारतील हवाई दल हे ही पूरग्रस्त भागात बचाव कार्यात सहभागी झाले आहेत.