35 C
Mumbai
Tuesday, November 5, 2024
घरविशेषराजभवनावर राज्यपालांच्याहस्ते झाले ध्वजारोहण

राजभवनावर राज्यपालांच्याहस्ते झाले ध्वजारोहण

REPUBLIC DAY,BHAGAT SINGH KOSHYARI, SHIVAJI PARK, FLAG HOSTING

Google News Follow

Related

महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राज्यातील जनतेला ७४ व्य प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.राजभवनावर राज्यपालांच्याहस्ते झाले ध्वजारोहण झाले .दादरच्या छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते ध्वजारोहण सोहळा पार पडला. छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर झालेल्या संचलनामध्ये राज्यपालांनी मानवंदना स्वीकारली. प्रजासत्ताक दिनानिमित्त राज्याला संबोधित करताना राज्यपालांनी महाराष्ट्र सरकार २०२६ पर्यंत १ बिलियन डॉलरची अर्थ व्यवस्था बाण्यासाठी प्रयत्न करत असल्याचे सांगितले. दावोसमध्ये झालेल्या परिषदेत महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक आली असल्याचे राज्यपालांनी सांगितले .

आपलय भाषणात राज्यपालांनी महाराष्ट्र सरकारच्या कामकाजाचा आढावा घेतला. राज्यात विविध प्रकल्पांच्या झालेल्या अंलबजावणीची माहितीही राज्यपालांनी दिली. राज्यातील १८ हजार पोलिस शिपायांची पदे भरण्यात येणार आहे. स्वातंत्र्य सैनिकांच्या निवृत्ती वेतनात १० हजारांनी वाढ करण्यात आली अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.

छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर सकाळी ९ वाजता राज्यपालांच्याहस्ते ध्वजारोहण झाले. त्यानंतर झालेल्या परेडमध्ये राज्यपालांनी विविध दलांच्या अधिकाऱ्यांकडून मानवंदना स्वीकारली. पोलिस विभागातील विविध पोलिस कर्मचाऱ्यांचे पदसंचलन यावेळी झाले. संरक्षण दलाची पथके ३० प्रजासत्ताक दिनानिमित्त सहभागी झाली होती. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यावेळी सपत्नीक उपस्थित होते .राज्य सरकारच्या  पर्यावरण , नगर विकास आदी विविध खात्यांची माहिती लोकांना व्हावी यासाठी १७ चित्ररथ यावेळी सहभागी झाले होते. मुंबईच्या महापौरांसह शहराचे पालकमंत्री आणि अन्य मंत्री, आमदार उपस्थित आहेत.

हे ही वाचा:

जाणून घ्या तुमच्या नेत्याला’

भाजपाचे मिशन मुसलमान २०२४

मला तुरुंगात टाकण्याचे टार्गेट दिले होते, पण…फडणवीस काय म्हणाले?

उद्धव ठाकरे यांचे भाषण म्हणजे भागम भागचा तिसरा भाग

हवाई हल्ल्याच्या कटाची माहिती गुप्तचर विभागाने दिल्याने मुंबई पोलीस पूर्वीपेक्षा अधिक सतर्क आणि सतर्क झाले आहेत. शिवाजी पार्क येथे कडक सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे. मुंबईतील गेट वे ऑफ इंडिया, मंत्रालय, विधिमंडळ, राज्यभवन आणि सीएसएमटी इमारतींना तिरंगी रंगाची आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
187,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा