‘सूर्यवंशम’मुळे वेड लागलं तर जबाबदार कोण? …प्रेक्षकाने चॅनेललाच लिहिलं पत्र

‘सूर्यवंशम’मुळे वेड लागलं तर जबाबदार कोण? …प्रेक्षकाने चॅनेललाच लिहिलं पत्र

अमिताभ बच्चन यांचा ‘सूर्यवंशम’ हा चित्रपट जवळपास दररोज टीव्ही चॅनलवर दाखवला जातो. लोकही आता या चित्रपटाला पार कंटाळून गेले आहेत, पण सांगणार कोणाला. मारून मुटकून बघा असे सर्वांचे झाले आहे. पण एका प्रेक्षकांचे मात्र हा सिनेमा पाहून पार डोके फिरले आणि त्याने तिरकस भाषेत चॅनलला सुनावले. त्याने थेट सोनी चॅनललाच पत्र पाठवले. त्याचे हे पत्र सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहे.

अमिताभ बच्चन यांचा सुपरहिट चित्रपट ‘सूर्यवंशम’ चित्रपट २१ मे १९९९ रोजी प्रदर्शित झाला. सूर्यवंशम हा चित्रपट ईव्हीव्ही सत्यनारायण यांनी दिग्दर्शित केला होता.या चित्रपटावर लोकांनी भरभरून प्रेम केले. या चित्रपटात अमिताभ बच्चन, अभिनेत्री सौंदर्या यांची महत्त्वपूर्ण भूमिका होती. त्याचबरोबर कादर खान, अनुपम खेर, जयसुधा यांच्याही या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिका आहेत. चित्रपटात रेखाने अमिताभ बच्चन यांच्या पत्नीची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्रीचा आवाज डब केला होता. जवळपास ७ कोटी रुपयांमध्ये बनलेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर सुमारे १२.६४ कोटी रुपयांचा गल्ला गोळा केला होता . विशेष म्हणजे, सूर्यवंशमच्या संदर्भात अनेक मीम्सही बनवण्यात आले आहेत.

सध्या गंमत अशी की आयपीएलचे थेट प्रक्षेपण झाले नाही, तर सोनी मॅक्स वाहिनीवर ‘सूर्यवंशम’ हा चित्रपट वारंवार प्रसारित केला जातो. सोनी मॅक्सवरील टेलिव्हिजन रेटिंगमध्ये या चित्रपटाने अव्वल स्थान पटकावले आहे आणि चॅनल महिन्यातून किमान एकदा त्याचे प्रसारण सुरू ठेवते.

हे ही वाचा:

गृहमंत्री अमित शहा यांनी पत्रकारांचे कान टोचले!

कम्पाउण्डरला डॉक्टरवर भरवसा नाही का?

समीर मयेकर, निकाळजे यांच्या विज्ञान प्रकल्पाचे यश

दाव्होसमध्ये १ लाख ३७ हजार कोटींचे करार

हा चित्रपट पाहून एका व्यक्तीने थेट टीव्ही चॅनलला पत्र लिहिले आहे. ‘सूर्यवंशम’च्या प्रसारणाबाबत त्या व्यक्तीने टीव्ही चॅनलला पत्र आपलं दुःख व्यक्त केलं आहे., ‘ तुमच्या चॅनलला सूर्यवंशम चित्रपटाचे कंत्राट मिळालेलं आहे. तुमच्या कृपेमुळे आम्हाला आणि आमच्या कुटुंबियांना हीरा ठाकूर आणि त्यांचे कुटुंब (राधा, गौरी आणि अन्य ) यांची सर्व माहितीही मिळाली आहे…आम्हाला सूर्यवंशम नावाच्या चित्रपटाची एक्सट्रा इनिंग पाहून पाहून तोंडपाठ झाली आहे असे या पत्रात म्हटले आहे.

हा चित्रपट तुमच्या चॅनलने आतापर्यंत कितीवेळा दाखवला हे मला जाणून घ्यायचे आहे. भविष्यात कितीवेळा हा चित्रपट दाखवणार ? जर या चित्रपटामुळे वेड लागले तर त्याला जबाबदार कोण? कृपया माहिती देण्याचा प्रयत्न करा… असे प्रश्न या व्यक्तीने विचारलेलं आहेत.

Exit mobile version