धक्कादायक! संक्रमण शिबिरातील रहिवाशांचे भाडे झाले सहापट

धक्कादायक! संक्रमण शिबिरातील रहिवाशांचे भाडे झाले सहापट

म्हाडा प्राधिकरणाकडून मुंबईतील ५६ वसाहतींना थकित लाखोंची रक्कम तसेच नवीन बिले भरण्यासाठी तगादा लावला आहे. म्हाडाच्या मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळानेही संक्रमण शिबिराचे भाडे वाढवले आहे. हे मासिक भाडे ५०० रुपयांवरून थेट ३ हजार रुपये इतके करण्यात आले आहे. तसेच हे भाडे भरण्यासाठी आता नोटीसा धाडण्याचे काम म्हाडाकडून केले जात आहे. लाखोंची ही भाडी पाहून संक्रमण शिबिरातील अनेक कुटुंबांनी ही बिले रद्द व्हायलाच हवीत असे म्हटले आहे.

यासंदर्भात बोलताना, गायकवाड नगर ओनर्स असोसिएशनचे अध्यक्ष फिरोज शेख म्हणाले, मासिक भाड्यामध्ये सहापट वाढ झालेली आहे. तसेच लाखोंच्या थकबाकीचे कारणही समजले नाही. त्यामुळे वारंवार म्हाडाकडे पत्रव्यवहार करून वाढीव भाडे रद्द करण्याची मागणी केली आहे. महाराष्ट्र टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार २०१० पासूनची थकीत रक्कम बिलामध्ये समाविष्ट करण्यात आलेली आहे. मालाड, मालवणी मधील गायकवाड नगरात संक्रमण शिबिरातील ३७६ घरांना २०१० पासून ते आत्तापर्यंत थकीत बिले भरण्याच्या नोटीसा आलेल्या आहेत. ही अवाजवी बिले पाहून रहिवाशी हवालदील झालेले आहेत. त्यामुळेच आता रहिवाशांकडून ही लाखोंची बिले रद्दबातल करण्यासाठी मागणी करण्यात येत आहे.

हे ही वाचा:

…तर खासगी बस व्यवसाय बंद पडेल!

केंद्राने देशभरात वितरित केल्या ५३ कोटी लशी

मदरशांनाही आणा शिक्षण हक्काच्या कक्षेत

ठाकरे सरकारने एसटी कर्मचाऱ्यांचे पगार थकवले

गायकवाड नगरामध्ये ५० ते ६० वर्षे जुन्या चाळी आहेत. तब्बल अडीच हजार घरे याठिकाणी आहेत. याच भागात सुमारे १५९ चाळी असून, संक्रमण शिबिरामध्ये ३७६ कुटुंबे राहात आहेत. याआधी संक्रमण शिबिरामध्ये राहणारे ५०० रुपये भाडे भरत होते. परंतु इमारत दुरुस्ती खात्याने मात्र हे भाडे चक्क ३ हजारांवर नेऊन ठेवल्याने रहिवाशांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. थकीत भाडे तसेच बिलांसाठी आता म्हाडाकडून वसुलीचा तगादा लावण्यात येत आहे.

Exit mobile version