विख्यात शास्त्रज्ञ डॉ. राजगोपाल चिदंबरम यांचे निधन

विख्यात शास्त्रज्ञ डॉ. राजगोपाल चिदंबरम यांचे निधन

भारतातल्या प्रमुख वैज्ञानिकांमधील एक विख्यात भौतिकशास्त्रज्ञ डॉ. राजगोपाल चिदंबरम यांचे आज ४ जानेवारी २०२५ रोजी पहाटे ३.२० वाजता निधन झाले. डॉ. चिदंबरम याचे भारताच्या विज्ञान क्षेत्रातील योगदान व त्यांची धोरणात्मक क्षमता तसेच विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील त्यांचे द्रष्टे नेतृत्व सदैव स्मरणात राहील. या शोककाळात त्यांच्या कुटुंबियांप्रती आमच्या भावपूर्ण संवेदना. संपूर्ण देश एका सच्च्या, द्रष्ट्या व्यक्तीला मुकला आहे. अशा भावना अणुउर्जा विभागाने आपल्या अधिकृत पत्रकात व्यक्त केल्या आहेत.

आपल्या देदीप्यमान कारकिर्दीत डॉ. चिदंबरम यांनी केंद्र सरकारचे प्रमुख वैज्ञानिक सल्लागार, भाभा अणु संशोधन केंद्राचे संचालक, अणुउर्जा आयोगाचे अध्यक्ष आणि अणुउर्जा विभागाचे केंद्रिय सचिव अशा महत्त्वपूर्ण पदांवर काम केले. आंतरराष्ट्रीय अणुउर्जा संस्थेच्या प्रशासक मंडळाचे ते १९९४ ते १९९५ या कालावधीत अध्यक्ष होते. या संस्थेच्या सन्माननीय व्यक्ती आयोगाचे ते सदस्यही होते. संस्थेच्या २०२० व त्यानंतरचा भविष्यकालीन आराखडा तयार करण्यामध्ये त्यांनी महत्त्वाचे योगदान दिले आहे.

हेही वाचा..

सांगलीच्या श्रीराम मंदिर चौकात १०० फुटी भगवा ध्वज उभारणार

फटाक्यांच्या कारखान्यात स्फोट ; ६ कामगारांचा मृत्यू

“दिल्लीकरांच्या पैशांनी बांधलेल्या शीशमहालाचा हिशोब केजरीवालांनी द्यावा”

“गावे स्वावलंबी असतील तेव्हाच देश स्वावलंबी होईल”

भारताचे अणुउर्जा सामर्थ्य वाढविण्यात त्याला आकार देण्यात डॉ. चिदंबरम यांनी निर्णायक भूमिका बजावली. १९७४ मध्ये झालेल्या भारताच्या पहिल्या अणुचाचणीत त्यांची भूमिका महत्त्वाची होती. १९९८ मध्ये झालेल्या पोखरण २ अणुचाचणीसाठी त्यांनी अणुउर्जा विभागाच्या पथकाचे नेतृत्व केले होते. त्यांच्या योगदानामुळे भारताला अणुउर्जा क्षेत्रात जागतिक स्तरावर मान्यता मिळाली.

आंतरराष्ट्रीय भौतिक वैज्ञानिक डॉ. चिदंबरम यांच्या उच्च दाब भौतिकशास्त्र अर्थात क्रिस्टलोग्राफी व पदार्थ विज्ञान क्षेत्रातील संशोधनामुळे विज्ञान क्षेत्रातील अभ्यासकांना या क्षेत्रातील विज्ञान समजून घेण्यात मोलाची मदत मिळाली. त्यांच्या या क्षेत्रातील मूलभूत कामामुळे भारताच्या पदार्थ विज्ञान क्षेत्र संशोधनाच्या आधुनिकतेचा पाया रचला गेला. १९३६ मध्ये जन्मलेले डॉ. चिदंबरम चेन्नईच्या प्रेसीडेन्सी महाविद्यालयाचे आणि बेंगळुरुच्या इंडियन इन्स्टीट्यूट ऑफ सायन्सचे माजी विद्यार्थी होते.

Exit mobile version