प्रसिद्ध ऑटोमोबाईल कंपनी रेनॉल्ट इंडियाने गुरुवारी आपल्या सर्व वाहनांच्या किमती २ टक्क्यांपर्यंत वाढवण्याची घोषणा केली. या नव्या किमती १ एप्रिलपासून लागू होणार आहेत.
कंपनीने स्पष्ट केले की ही दरवाढ मॉडेल आणि व्हेरिएंटनुसार वेगवेगळी असेल. उत्पादन खर्चात वाढ झाल्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचे कंपनीने सांगितले.
रेनॉल्ट इंडिया कंपनीचे सीईओ आणि एमडी वेंकटराम ममिलपल्ले यांनी सांगितले की, बराच काळ दर स्थिर ठेवण्याच्या प्रयत्नांनंतर आता वाढत्या खर्चामुळे किंमत वाढवणे आवश्यक झाले आहे.
त्यांनी असेही नमूद केले की, कंपनी ग्राहकांना मदत करण्यासाठी उत्पादन खर्च स्वतः सोसत होती. मात्र सर्वोत्तम गुणवत्ता आणि नवीन उत्पादने देत राहण्यासाठी दरवाढ अपरिहार्य झाली आहे.
गेल्या दोन वर्षांत रेनॉल्टने पहिल्यांदाच दरवाढ केली आहे. यापूर्वी कंपनीने फेब्रुवारी २०२३ मध्ये किमती वाढवल्या होत्या. अधिकृत निवेदनानुसार, या दरवाढीचा परिणाम ट्रायबर, काइगर आणि क्विड यांसारख्या लोकप्रिय रेनॉल्ट मॉडेल्सवर होणार आहे.
रेनॉल्ट ट्रायबरची प्रारंभिक किंमत ६.०९ लाख रुपये (एक्स-शोरूम) असून, ती सीएनजी पर्यायासह उपलब्ध आहे.
रेनॉल्ट काइगर एसयूव्हीची किंमत ६.०९ लाख रुपये (एक्स-शोरूम) पासून सुरू होते आणि ती टर्बो पेट्रोल इंजिन पर्यायासह येते.
रेनॉल्ट क्विडची प्रारंभिक किंमत ४.६९ लाख रुपये (एक्स-शोरूम) आहे.
हेही वाचा :
आदर्श बंधु संघाचा ‘फाग महोत्सव २०२५’ दणक्यात साजरा
भारताच्या ताब्यात न येण्यासाठी राणाची तडफड सुरूचं; स्थगितीसाठी मुख्य न्यायाधीशांकडे अर्ज
“दिशाच्या वडिलांनी याचिका दाखल करून योग्य केले”
शाहरुखच्या मदतीने रंजूने पतीला संपवले…
यापूर्वी किआ, होंडा, टाटा मोटर्स आणि मारुती सुझुकी यांनीही वाढत्या उत्पादन खर्चामुळे वाहनांच्या किमती वाढवण्याची घोषणा केली होती.
मीडिया अहवालांनुसार, ऑटोमोबाईल उत्पादक कच्च्या मालाच्या किंमती, लॉजिस्टिक्स आणि उत्पादन खर्च वाढल्यामुळे अडचणीत सापडले आहेत. जागतिक पुरवठा साखळीतील अडथळे आणि वाढती मागणी यामुळे कच्च्या मालाच्या दरांमध्ये वाढ झाली आहे.