24 C
Mumbai
Tuesday, December 24, 2024
घरविशेषविशाळगडावरील अतिक्रमण हटवा अन्यथा वक्फ बोर्डाच्या जमिनीवर मंदिरे बांधू !

विशाळगडावरील अतिक्रमण हटवा अन्यथा वक्फ बोर्डाच्या जमिनीवर मंदिरे बांधू !

सकल हिंदू समाज आक्रमक, गडाच्या पायथ्याशी केली महाआरती

Google News Follow

Related

विशाळगडाच्या पायथ्याशी सकल हिंदू समाजाच्या वतीने महाआरती करण्यात आलेली आहे. विशाळगड अतिक्रमण मुक्त व्हावे यासाठी कोर्टात याचिका दाखल करण्यात आली असून या प्रकरणावर जलदगतीने सुनावणी व्हावी अशी मागणी यावेळी सकल हिंदू समाजाच्या वतीने करण्यात आली आहे. अतिक्रमण हटवा अन्यथा वक्फ बोर्डाच्या जमिनीवर मंदिरे बांधू, असा इशारा सकल हिंदू समाजाकडून देण्यात आला आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील विशाळगडावर असलेलं अतिक्रमण काढलं जावं या मागणीकरिता आता शिवप्रेमींकडून ‘विशाळगड मुक्तिसंग्राम’ मोहिमेला सुरुवात करण्यात आली आहे. ‘विशाळगड मुक्तिसंग्रामा’चा भाग म्हणून आज ( ७ जुलै) विशाळगडाच्या पायथ्याशी महाआरतीचे आयोजन करण्यात आले होते. या महाआरतीसाठी कोल्हापूर जिल्ह्यातीलच नाहीतर राज्यातील हजारो शिवभक्त विशाळगडाच्या पायथ्याशी दाखल झालेले होते. या मोहिमेत पुरुष, महिला आणि तरुणांनी मोठ्या प्रमाणात आपला सहभाग नोंदवला.

हे ही वाचा:

बसप कार्यकर्त्याच्या निर्घृण हत्येनंतर मायावतींचा सवाल; तामिळनाडूत कायदा-सुव्यवस्था कुठे आहे?

रत्नागिरीतील गोहत्या बंद करा…संतप्त हिंदू समाजाचा मोर्चा !

छत्तीसगडच्या सुकमा येथे ५ नक्षलवाद्यांना अटक !

मुंबईतील वरळीत हिट अँड रनची घटना, महिलेचा मृत्यू!

दरम्यान, गेल्या अनेक दिवसांपासून विशाळगडावरील अतिक्रमणाचा मुद्दा गाजत आहे. विशाळगडावर जवळपास शंभरहुन अधिक अतिक्रमण असल्याचा दावा शिवप्रेमींकडून केला जात आहे. त्याच्यावर कारवाई करण्याची मागणी देखील अनेक वर्षांपासून केली जात आहे. सध्या हे प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे परंतु हे अतिक्रमण तात्काळ काढलं जावं अशी मागणी हिंदू समाजाकडून केली जात आहे. आजच्या महाआरतीमध्ये पुरुष, महिला, तरुणांनी हातात फलक आणि भगवे झेंडे घेऊन जोरदार घोषणाबाजी केली. विशाळगडावरील अतिक्रमण काढण्याचे हे शेवटचे आंदोलन असल्याचे शिवप्रेमींकडून सांगण्यात आले असून राज्यसरकारला एक प्रकारचा निर्वाणीचा इशारा देण्यात आला आहे.

 

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा