हिंदू धार्मिक स्थळ परिसरातील मुस्लीम समाजाची दुकाने हटवा

विश्व हिंदू परिषदेची मागणी

हिंदू मंदिरे आणि तीर्थस्थळे यांच्या परिसरात असणारी मुस्लीम समाजाची दुकाने हटवण्याची मागणी विश्व हिंदू परिषदेने केली आहे. विहिंपचे महामंत्री बजरंग बागडा यांनी मंगळवारी सांगितले की, आम्हाला अनेक स्थानांची माहिती मिळाली आहे की, जिथे मुस्लीम भारत मत कि जय किंवा वंदे मातरम बोलत नाहीत.

मूर्ती पूजा मनात नाहीत आणि दुसरीकडे हिंदू देवी देवतांच्या नावाने धर्मस्थळावर प्रसाद आणि पूजा साहित्य विकत आहेत. अनेकदा खाद्य पदार्थांवर थुंकून त्याला अपवित्र केले जाते आणि त्यानंतर ते हिंदूना विकले जाते, अशा अनेक घटना देशभरातील अमोर आल्या आहेत. त्यामुळे हिंदूंच्या भावना दुखावल्या जात असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

हेही वाचा..

म्हणे “धर्मनिरपेक्षतेसाठीच अल्पसंख्यांकांना राजकीय आरक्षण !”

वसंत मोरेंची आता नवी पसंत..उबाठा गटात प्रवेश !

दाम्पत्याच्या आत्महत्येचे अखिलेश यादव यांनी केले राजकारण

मॉस्कोतून नरेंद्र मोदी म्हणाले, भारताला तिसरी मोठी अर्थव्यवस्था बनवणार!

महामंत्री बागडा म्हणाले, अनेक ठिकाणी अशा घटना घडत आहेत. यावर प्रतिबंध आणण्याची गरज आहे. अशा पद्धतीने हिंदू धर्मातील वस्तू, प्रसाद अपवित्र करून विकणे म्हणजे हिंदू धर्माच्या आस्थेबाबत छेडछाड केल्यासारखे आहे.
विश्व हिंदू परिषदेने सर्व राज्यातील अशा धर्मद्रोह्यापासून सावधान राहण्याचे आवाहन केले आहे. असे प्रकार होत असतील तर स्थानिक प्रशासनाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Exit mobile version