औरंगजेबाची कबर हटवा अन्यथा बाबरीची पुनरावृत्ती होईल!

विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाचा इशारा

औरंगजेबाची कबर हटवा अन्यथा बाबरीची पुनरावृत्ती होईल!

औरंगजेबाच्या कबरीविरोधात राज्यभरातून प्रतिक्रिया येत आहेत. छत्रपती संभाजीनगरमध्ये असलेली औरंगजेबाची कबर हटवण्याची मागणी केली जात आहेत. राज्यभरातील विविध हिंदू संघटना आणि भाजपा नेत्यांकडून यासाठी आंदोलने करण्यात येत आहेत. याच दरम्यान, औरंगजेबाच्या कबरीविरोधात पुण्यामध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल आक्रमक झाली आहे. औरंगजेबाची कबर हटवा अन्यथा बाबरीची पुनरावृत्ती होईल, असा इशारा संघटनांकडून देण्यात आला आहे.

येत्या १७ मार्चला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कबर हटवण्यासाठी आंदोलन करण्यात येणार आहे. औरंगजेबाची कबर महाराष्ट्रात नाहीतर भारतात कोठेही ठेवू नये अशी मागणी विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल संघटनेकडून करण्यात आली आहे.

संघटनांनी सांगितले की,  सरकारने पुढील काळात शासनाच्या नियमात असून केंद्र सरकारच्या चर्चेतून ही कबर नियमांनुसार काढावी. सरकारने जर काही अपेक्षित कार्य केले नाही तर विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्यामार्फत औरंगजेबाची कबर आम्ही पुढील काळात सरकारला सांगून त्या दिवशी कबरीवर कारसेवा करू.

हे ही वाचा : 

१८ जिल्ह्यांत प्राथमिक आरोग्य केंद्रांचे सौर ऊर्जीकरण

होळी मिरवणुकीदरम्यान दोन गटांत दगडफेक

तमिळनाडू बजेटमध्ये ‘₹’ चिन्ह काढणे हे राष्ट्रविरोधी पाऊल

सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर यांना परत आणण्याचे मिशन सुरू

दरम्यान, औरंगजेबाची कबर परिसरात पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. एसआरपीएफची एक तुकडी तैनात करण्यात आली आहे. तसेच दोन अधिकारी आणि १५ पोलीस कर्मचारी देखील बंदोबस्तात आहेत. यासह दोन ठिकाणी नाकाबंदी देखील करण्यात आली आहे. कबरीकडे जाणाऱ्यांची चौकशी आणि तपासणी केली जात आहे. औरंगजेबाची कबर उखडून टाकण्याचा इशारा विश्व हिंदू परिषदेने दिला आहे. त्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी प्रशासनाकडून योग्य ती खबरदारी घेतली जात आहे.

मेहेंदळे वाचा !आव्हाड, मिटकरी नव्हे | Mahesh Vichare | Jitendra Awhad |  |

Exit mobile version